लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, ८ आॅगस्ट रोजी आणखी ३४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर एका रुग्णाचा उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. दरम्यान २१ जणांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला.जिल्ह्यात मेडशी येथे पहिला कोरोनाबाधीत रुग्ण एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढळला होता. मे महिन्याच्या अखेरीस परराज्य, परजिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरीक जिल्ह्यात परतले. जून, जुलै महिन्याच्या तुलनेत आॅगस्ट महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवारी यामध्ये ३४ जणांची भर पडली. वाशिम शहरातील सुदर्शन नगर येथील ६, गणेश पेठ येथील १, सुंदरवाटिका २, बेलदार गल्ली येथील १, शिरसाळा येथील १, पार्डी आसरा येथील १, वाघोली येथील १, वाई येथील १, रिसोड शहरातील जिजाऊ नगर येथील ६, गोहगाव हाडे येथील २, मंगरुळपीर शहरातील टेकडीपुरा येथील १, पोस्ट आॅफिसच्या लगतच्या परिसरातील ३, बोरव्हा येथील १, शेलुबाजार येथील १, कवठळ येथील ५, शेगी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.दरम्यान, ७ आॅगस्ट रोजी कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या देवगाव (ता. वाशिम) येथील ५६ वर्षीय व्यक्तीचा शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.शनिवारी २१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी (डिस्चार्ज) देण्यात आली.आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ९०४ वर पोहोचली असून, त्यातील १८ जणांचा मृत्यू, एकाची आत्महत्या तर ५१२ लोक बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आता ३७३ रुग्णांंवर उपचार सुरू आहेत.(प्रतिनिधी)
CoronaVirus in Washim : आणखी एकाचा मृत्यू; ३४ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 11:42 AM