लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात दररोज कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असताना, सोमवार २७ जुलै रोजी प्राप्त ३५ अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हावासियांना तेवढाच दिलासा मिळाला. दरम्यान, सोमवारी २३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. दुसरीकडे कारंजा येथील एका कोरोनाबाधित महिलेचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.जिल्ह्यात जुलै महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हावासियांच्या चिंतेत भर पडत आहे. सोमवारी दिवसभरात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नसल्याने जिल्हावासियांना तुर्तास थोडा दिलासा मिळाला; परंतू, कोरोनाबाधित एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने धाकधूकही कायम आहे. सोमवारी ३५ अहवाल प्राप्त झाले असून सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत.जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५३१ असून, यापैकी ३१८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली. २०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची आरोग्य तपासणी तसेच सर्र्र्वेक्षण हे आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासनाच्यावतीने केले जात आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या परिसर सील करण्यात आलेला आहे.
एका महिला रुग्णाचा मृत्यूवाशिम येथे कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कारंजा लाड शहरातील इंगोले प्लॉट येथील ५० वर्षीय महिलेचा २७ जुलै रोजी उपचारादरम्यान सकाळी १०.३० वाजतादरम्यान मृत्यू झाला. ही महिला २१ जुलै रोजी कोरोनाबाधित आढळली होती.२३ जणांना डिस्चार्जसोमवारी २३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या वाशिम शहरातील ७, तोंडगाव (ता. वाशिम) येथील ३, मंगरूळपीर शहरातील पठाणपुरा येथील ३, झाडगाव येथील १, कारंजा लाड शहरातील गवळीपुरा येथील १, कारंजा लाड शहरातील जिजामाता चौक परिसरातील १, कारंजा लाड शहरातील तुळशी विहार परिसरातील १, चुना पुरा परिसरातील १, गायत्री नगर परिसरातील १ व आनंद नगर परिसरातील १, रिसोड शहरातील इंदिरा नगर परिसरातील १, रिसोड तालुक्यातील वनोजा येथील १ व मांगवाडी येथील १ अशा एकूण २३ व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ३१८ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.