वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद २५ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. आतापर्र्यंंत कोरोनाबळींची संख्या ८२ वर पोहचल्याने जिल्हावासियांची चिंता अधिकच वाढली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आणखी ४९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २५ सप्टेंबर रोजी पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या ३९३५ वर पोहचली. १२४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी दिवसभरात ४९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील सिव्हील लाईन्स येथील १, शृंगऋषी कॉलनी १, नवीन आययुडीपी १, चामुंडादेवी परिसर ३, साईलीला नगर १, नवीन पोलीस वसाहत ३, विनायक नगर ४, पाटणी चौक १, शुक्रवार पेठ १, आययुडीपी १, तंत्रनिकेतन महाविद्यालय १, पोलीस स्टेशन परिसर १, पोस्ट आॅफिस १, शहरातील इतर ठिकाणचे २, अनसिंग येथील ४, तामसी येथील १, केकतउमरा येथील २, शेलगाव येथील १, काटा येथील १, रिसोड शहरातील पॉवर हाऊस परिसरातील १, अनंत कॉलनी परिसरातील ४, सिव्हील लाईन्स येथील १, सोनाटी येथील ३, आसेगाव पेन येथील १, गणेशपूर येथील १, व्याड येथील १, बेलखेडा येथील २, मालेगाव तालुक्यातील इराळा येथील १, कारंजा लाड शहरातील ३ व्यक्ती कोरोना बाधितांचा समावेश आहे.
१२४ व्यक्तिंना डिस्चार्जजिल्ह्यात उपचार घेत असलेल्या १२४ व्यक्तींना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच उपचारा दरम्यान मृत्यू झालेल्या वाशिम शहरातील दोन महिला व पिंप्री वरघट येथील ६५ वर्षीय महिलेचा कोरोना विषयक अहवाल काल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच कुराळा येथील ५० वर्षीय व अमानी ६० वर्षीय व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.------------------