वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी चार जणांचा मृत्यू झाल्याची नोंद गुरूवार, १० सप्टेंबर रोजी घेण्यात आली तर ८९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. आता कोरोनाबाधितांची संख्या २४६९ वर पोहोचली आहे. दरम्यान मंगळवारी ३२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्या वाढीबरोबरच उपचारादरम्यान मृत्यू होणाºयांची संख्याही वाढत असल्याने जिल्हावासियांची चिंता अधिकच वाढली आहे. गुरूवारी एकूण चार मृत्यूची नोंद झाली असून, यामध्ये जिल्ह्यात एक तर जिल्ह्यातील रुग्ण; परंतू जिल्ह्याबाहेर उपचार घेणाºया तिघांचा समावेश आहे. नव्याने ८९ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे गुरूवारी निष्पन्न झाले. यामध्ये वाशिम शहरातील अल्लाडा प्लॉट परिसर १, पोलीस वसाहत परिसर २, चंडिकावेस परिसर ८, पोलीस स्टेशन परिसर १, पाटील धाबा जवळील २, काळे फाईल परिसर १, इनामदारपुरा परिसर १, सुदर्शन नगर परिसर २, महात्मा फुले चौक परिसर १, जांभरुण महाली येथील ३, शिरपुटी येथील ६, मंगरूळपीर शहरातील संताजी नगर येथील ४, सोनखास येथील १, शेगी येथील १, निंबी येथील १, जनुना येथील १, कासोळा येथील १, मोहरी येथील १, गोलवाडी येथील १, कारंजा लाड शहरातील रंगारीपुरा येथील १, शांतीनगर येथील २, माळीपुरा येथील १, गवळीपुरा येथील १, शिक्षक कॉलनी परिसर १, एम. जे. हायस्कूल परिसर १, बाबरे कॉलनी परिसर १, वाणीपुरा येथील १, मानोरा तालुक्यातील इंझोरी येथील ८ , रिसोड शहरातील ब्राह्मण गल्ली परिसर १, अनंत कॉलनी परिसर २, देशमुख गल्ली परिसर १, गुजरी चौक परिसर ३, मालेगाव चौक परिसर १, गीताई नगर येथील १, सराफा लाईन परिसर ४, पंचवटकर गल्ली परिसर १, गैबीपुरा येथील १, बेंदरवाडी परिसर १, निजामपूर येथील ३, सवड येथील ४, रिठद येथील २, देगाव येथील १, महागाव येथील ४, किनखेडा येथील २, केनवड येथील १ अशा ८९ जणांचा समावेश आहे.आता कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २४६९ झाली असून, यापैकी १६८३ जणांनी कोरोनावर मात केली तर ४९ जणांचा मृत्यू आणि एकाने आत्महत्या केली. आता ७३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मुंगळा येथील एकाचा मृत्यू, जिल्ह्याबाहेर तीन मृत्यूजिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात उपचारादरम्यान रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे जिल्हावासियांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथील ६८ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद १० सप्टेंबरला घेण्यात आली तसेच जिल्ह्यातील रुग्ण; परंतू जिल्ह्याबाहेर उपचार घेणाºया तीन जणांचा मृत्यू झाल्याची नोंदही १० सप्टेंबरला करण्यात आली. आतापर्यंत एकूण ४९ मृत्यू झाले असून, एका रुग्णाने आत्महत्या केली.
३३ जणांना डिस्चार्जगुरूवारी एकूण ३२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये वाशिम शहरातील इंदिरा चौक येथील १, लाखाळा येथील १, नवीन पोलीस वसाहत परिसर १, दंडे चौक परिसर २, देवपेठ येथील ६, फाळेगाव येथील १, घोटा येथील १, मालेगाव शहरातील २, डव्हा येथील २, ब्राह्मणवाडा येथील १, रिसोड शहरातील महानंदा कॉलनी परिसर १, शिवाजी नगर परिसर ५, देशमुख गल्ली परिसर ३, शहरातील इतर ठिकाणच्या १, खडकी सदार येथील १, येवती येथील १, मानोरा तालुक्यातील इंझोरी येथील १, रुईगोस्ता येथील १ अशा ३५ जणांचा समावेश आहे.
७३६ रुग्णांवर उपचार सुरूजिल्ह्यात आतापर्यंत २४६९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यापैकी १६८३ रुग्ण बरे झाले असून, त्यांना सुटी देण्यात आली. उर्वरीत ७३६ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरू आहेत.