शहरं
Join us  
Trending Stories
1
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
2
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
3
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
4
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
5
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
6
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
7
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
8
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
9
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
10
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
11
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
12
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
13
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
14
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
15
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
16
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
17
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
18
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
19
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
20
बहिणीच्या अवयदानाला भावाने दिली संमती; चौघांना मिळाले जीवदान

CoronaVirus in Washim : आणखी सात पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ४९ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 6:35 PM

आता जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ४९ झाली असून, यापैकी दोघांचा मृत्यू तर सात जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना यापूर्वीच रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बोराळा येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील एक, रिसोड तीन व कारंजा येथील दोन, शेलुबाजार एक अशा एकूण ७ रुग्णांचा कोरोना चाचणीचा अहवाल १३ जून रोजी सायंकाळी पॉझिटिव्ह आला. आता जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ४९ झाली असून, यापैकी दोघांचा मृत्यू तर सात जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना यापूर्वीच रुग्णालयातून सुटी देण्यात आली. उर्वरीत ४० जणांवर  विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात परराज्य, परजिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरीक परतत असून, सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे असणाºया संदिग्ध रुग्णांना तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे. गत चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येते. १३ जून रोजी यामध्ये ७ रुग्णांची भर पडली. बोराळा हिस्से (ता. वाशिम) येथील ३२ वर्षीय महिलेचा अहवाल 'पॉझिटिव्ह' आला आहे. सदर महिला बोराळा हिस्से येथील १० जून रोजी 'पॉझिटिव्ह' अहवाल आलेल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहे.कारंजा लाड विश्रामगृह परिसरातील कोरोनाबाधित व्यक्तीच्या नजीकच्या संपर्कातील ४५ वर्षीय महिला व १५ वर्षीय युवतीला कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निदान झाले. औरंगाबाद येथून रिसोड येथे आलेल्या २०, २४ व २७ वर्षीय युवकांचे कोरोनाविषयक चाचणी अहवाल 'पॉझिटिव्ह' आले आहेत.शेलुबाजार (ता. मंगरुळपीर) येथील ६५ वर्षीय व्यक्तीला कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. सदर व्यक्तीला कोरोनाची लक्षणे असल्याने खासगी रुग्णालयातून 'रेफर' करण्यात आले होते. आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णाची एकूण संख्या ४९ अशी झाली आहे. यापैकी दोघांचा मृत्यू तर सात जणांनी कोरोनावर मात केली. उर्वरीत ४० जणांवर तालुकास्तरीय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला एरिया सील करण्याची कार्यवाही पोलीस, महसूल, नगर परिषद, ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने सुरू केली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या ‘हाय-रिस्क’ संपर्कात किती जण आले याची माहिती घेण्याबरोबरच कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी सर्वे सुरू करण्यात आला.

एका रुग्णाला सुटीभोयणी ता. मानोरा येथील ६० वर्षीय महिलेने कोरोनावर मात केल्याने या रुग्णाला १३ जून रोजी विलगीकरण कक्षातून सुटी देण्यात आली. आता एकूण ४० जणांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम