वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, या जीवघेण्या आजाराला बळी पडणाऱ्यांची व संसर्ग होणाऱ्यांची संख्या दिवसेंंदिवस वाढतच आहे. गुरूवार, २७ आॅगस्ट रोजी शेलुबाजार येथील दोघांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ३० वर पोहोचला आहे. दिवसभरात एकूण २८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १५६६ झाली आहे.जिल्ह्यात आॅगस्ट महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. २७ आॅगस्ट रोजी २८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये वाशिम शहरातील तिरुपती सिटी परिसरातील १, अनसिंग येथील १, मालेगाव शहरातील वॉर्ड क्र. सहा येथील ६, मंगरूळपीर शहरातील मंगलधाम परिसरातील २, सुभाष चौक परिसरातील २, शेलूबाजार येथील ७, लाठी येथील ५, नागी येथील १, कारंजा लाड शहरातील महावीर कॉलनी परिसरातील १, संतोषी माता कॉलनी परिसरातील १, मानकनगर परिसरातील १ अशा २८ व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेर आणखी ९ कोरोना बाधित व्यक्तींची नोंद झाली.शेलुबाजार येथील दोघे दगावले!शेलुबाजार येथे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. दरम्यान २३ आॅगस्ट रोजी कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या मंगरूळपीर तालुक्याील शेलूबाजार येथील ७५ वर्षीय व्यक्तीचा २६ आॅगस्ट रोजी सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.काही रुग्णांवर जिल्हा कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. २४ आॅगस्ट रोजी रात्री जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल झालेल्या व २६ आॅगस्ट रोजी पहाटे ३ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या शेलूबाजार येथील ८४ वर्षीय व्यक्तीचा कोरोना विषयक अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.३७५ जणांना उपचारआतापर्यंत जिल्ह्यात १५६६ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी २९ जणांचा मृत्यू, एकाची आत्महत्या तर ११६१ जण बरे झाले. उर्वरीत ३७५ जणांवर कोविड केअर सेंटर व जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
२० जणांची कोरोनावर मात४गुरूवारी २० जणांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत एकूण ११६१ जण बरे होऊन घरी परतले आहेत.