लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात आॅगस्ट महिन्यातही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, २३ आॅगस्ट रोजी दिवसभरात एकूण ४९ रुग्णांची यामध्ये भर पडली. दरम्यान ढिल्ली (ता.वाशिम) आणि लाठी (ता. मंगरूळपीर) येथील प्रत्येकी एक अशा दोन कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान २२ आॅगस्ट रोजी मृत्यू झाला. आता कोरोनाबाधितांची संख्या १४३१ वर पोहोचली आहे. यापैकी ३७८ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील अन्य संदिग्धांचे अहवालही पॉझिटिव्ह येत असल्याने जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. २३ आॅगस्ट रोजी ३९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये वाशिम शहरातील चामुंडादेवी मंदिर परिसरातील ५, गुरुवार बाजार परिसरातील १, कोल्हटकरवाडी परिसरातील ३, लाखाळा परिसरातील ८, काळे फाईल परिसरातील १, वारा जहांगीर येथील ६, मंगरूळपीर शहरातील हरिकृपा कॉलनी परिसरातील १, लाठी येथील १, शेलूबाजार येथील ३, रिसोड तालुक्यातील सवड येथील १, येवती येथील १, धोडप बोडखे येथील ३, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील ८, दुधाळा येथील ३, मानोरा तालुक्यातील आसोला खु. येथील २, उमरी बु. येथील १, कारंजा लाड तालुक्यातील शेवती येथील १ व्यक्तीचा समावेश आहे.आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४३१ वर पोहोचली असून, त्यातील २६ जणांचा मृत्यू, एकाची आत्महत्या तर १०२६ लोक बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आता ३७८ जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात किती जण आले, याची माहिती स्थानिक स्वराज्य संस्था आणि आरोग्य विभागातर्फे घेण्यात येत आहे.
दोन जणांचा मृत्यू२१ आॅगस्ट रोजी कोरोनाविषयक अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या वाशिम तालुक्यातील ढिल्ली येथील ४५ वर्षीय व्यक्तीच २२ आॅगस्ट रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच नागपूर येथे कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झालेल्या मंगरूळपीर तालुक्यातील लाठी येथील ६० वर्षीय व्यक्तीचाही २२ आॅगस्ट रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
२८ जणांना डिस्चार्जरविवारी २८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या वाशिम शहरातील पतंजली चिकित्सालय परिसरातील १, शिवप्रताप नगर येथील १, कोल्ही येथील १, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील १, शिरसाळा येथील १४, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प येथील १, बायपास रोड परिसरातील २, भारतीपुरा येथील १, सोहळ येथील २, भिलडोंगर येथील १, रिसोड शहरातील एकता नगर येथील १, चिचांबाभर येथील २ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला.