वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद २२ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. आतापर्यंत कोरोनाने ६९ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मंगळवारी दिवसभरात आणखी ७८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या ३७२४ वर पोहचली. ७० जणांनी कोरोनावर मात केल्याने मंगळवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.आॅगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मंगळवारी यामध्ये ७८ जणांची भर पडली. यामध्ये वाशिम तालुक्यातील केकतउमरा येथील १, मालेगाव शहरातील ३, रिसोड तालुक्यातील कोयाळी येथील ५, चिचांबाभर येथील ५, येवती येथील १, मानोरा शहरातील ५, वाईगौळ येथील ३, हातोली येथील १, मंगरूळपीर शहरातील ६, पारवा येथील ३, तपोवन येथील २, शेलूबाजार येथील १, उमरी येथील १, वनोजा येथील ९, मोझरी येथील १, चिंचाळा येथील ३, मोहरी येथील १, कारंजा लाड शहरातील वाल्मिकी नगर येथील २, तुषार कॉलनी येथील ३, ममता नगर येथील ४, गौतम नगर येथील ४, साईनगर येथील १, आंबेडकर चौक परिसर १, मंगरूळवेस परिसर १, इंदिरानगर परिसर १, हिवरा लाहे येथील १, कामरगाव येथील २, धामणी खडी येथील १, बेंबळा येथील ३, गिर्डा येथील १, तपोवन येथील १, खेर्डा येथील १ अशा ७८ जणांचा समावेश आहे. आता जिल्ह्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३७२४ वर पोहोचली असून, त्यातील ६९ जणांचा मृत्यू, एकाची आत्महत्या तर २७९५ लोक बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.रिसोड, शेलुबाजार येथील रुग्णाचा मृत्यूसप्टेंबर महिन्यात कोरोनाबळींची संख्याही वाढत आहे. यामध्ये मंगळवारी दोन जणांची भर पडली. रिसोड शहरातील १ व शेलूबाजार येथील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनामुळे ६९ जणांचा मृत्यू झाला. मृत्यूची संख्या वाढत असल्याने जिल्हावासियांची चिंताही वाढली आहे.
७० जणांना डिस्चार्जएकिकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. मंगळवारी जिल्ह्यातील ७० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.