मानोरा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या तळप बु. येथील तक्रारदाराने वडिलोपार्जित मालमत्तेचा ‘आठ-अ’ बनवून देण्याची मागणी ग्रामसेवक बालाजी सोनटक्के याच्याकडे केली होती. ‘आठ-अ’ बनवून देण्यासाठी आठ हजार रुपयांच्या लाचेची मागणी ग्रामसेवकाने केली. यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ५ जानेवारी रोजी तक्रार केली. या तक्रारीनुसार ५ जानेवारी रोजी पडताळणी करण्यात आली. ६ जानेवारी रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास मानोरा पंचायत समिती आवारात सापळा रचला असता, आरोपीने तक्रारदाराकडून आठ हजार रुपये स्वीकारताच पथकाने आरोपीला पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आली. ही कारवाई वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस निरीक्षक एन. बी. बोराडे, पोलीस कर्मचारी आसिफ शेख, नितीन तवलाकर, अरविंद राठोड, सुनील मुंदे, वाजिद शेख यांनी केली.
लाचखोर ग्रामसेवक ‘एसीबी’च्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 6:10 AM