शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

परजिल्ह्यातील कापूस वाशिम जिल्ह्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 12:28 PM

यवतमाळ जिल्ह्यासह, अकोला, हिंगोली व इतर जिल्ह्यातील कापूस या केंद्रावर दाखल होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गेल्या काही दिवसांत खासगी बाजारात कपाशीच्या दरात मोठी घसरण झाल्याने कापूस उत्पादकांनी शासकीय खरेदी केंद्राकडे मोर्चा वळविला आहे. त्यात वाशिम जिल्ह्यात यवतमाळ जिल्ह्यासह, अकोला, हिंगोली व इतर जिल्ह्यातील कापूस या केंद्रावर दाखल होत असल्याने जिल्ह्यातील कापूस उत्पादकांची पंचाईत झाली असून, कापूस मोजणीसाठी दोन दिवस लागत असल्याने शेतकऱ्यांना वाहन भाड्याचा भुर्दंडही सोसावा लागत आहे.यंदाच्या खरीप हंगामात वाशिम जिल्ह्यात ३० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात कपाशीची लागवड झाली. प्रामुख्याने मानोरा, मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यात कपाशीची लागवड होती. नोव्हेंबर, डिसेंबरमधील अवकाळी पावसाचा फटका वगळता कपाशीचे उत्पादनही चांगले झाले. तथापि, कापसाची खरेदी सुरू झाल्यानंतर खासगी बाजारात कापसाचे दर गडगडले. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले. दरम्यान, जिल्ह्यात अनसिंग आणि मंगरुळपीर येथे थेट सीसीआयने, तर मानोरा आणि कारंजा येथे सीसीआयचे उपअभिकर्ता (सबएजंट) म्हणून कापूस पणन महासंघाने कपाशीची खरेदी सुरु केली. बाजारात दर घटल्याने शासकीय खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, आजवर १.५० लाख क्विंटलपेक्षा अधिक कपाशीची खरेदी या केंद्रावर झाली आहे. मंगरुळपीर आणि अनसिंगसह कारंजा येथील केंद्रावर वाहनांच्या मोठ्या रांगा उभ्या असल्याचे दिसून येत आहे. त्यातच यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यातील कापूसही येथे विक्रीसाठी येत असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कापूस मोजणीला प्रचंड विलंब होत आहे.

 शेतकºयाचा दोन दिवस मुक्कामकोठारी: मंगरुळपीर येथे बियाणी जिनिंग फॅ क्टरीत सीसीआयचे खरेदी केंद्र आहे. या ठिकाणी मंगरुळपीर तालुक्यातील अनेक शेतकरी कापूस विक्रीसाठी आणत आहेत. त्यात कोठारी येथील ज्ञानेश्वर हिमगिरे, रामेश्वर हिमगिरे, गणेश करडे आणि विठ्ठल पवार या शेतकºयांनी १६ मार्च रोजी सकाळी कापूस मोजणीसाठी आणल्यानंतरही १७ मार्च रोजी ६ वाजेपर्यंतही त्यांच्या कपाशीची मोजणी होऊ शकली नव्हती. परजिल्ह्यातील कापूस, येथे येत असल्याने आम्हाला दोन दिवस मुक्काम करावा लागतो. त्यामुळे इतर कामे खोळंबतात आणि वाहनभाड्याचा अतिरिक्त भुर्दंडही सोसावा लागत असल्याचे कोठारी येथील शेतकरी विठ्ठल पवार यांनी सांगितले.सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर देशातील कोठूनही आलेला कापूस खरेदी करावा लागतो. आम्हाला शेतकºयास नकार देता येत नाही. कापसाची आवक वाढल्याने क्रमांकानुसार मोजणी करण्यात येत आहे.- उमेश तायडे,सीसीआय खरेदी केंद्रप्रमुखमंगरुळपीर,

मानोरा येथील खरेदी केंद्रावरपूर्वी कापूस मोजणीला विलंब होत असे; परंतु शेतकºयांना विलंब होऊ नये म्हणून, बाजार समितीच्यावतीने एसएमएस पाठवून मोजणीच्या दिवशीच बोलावण्यात येत आहे.-एस. बी. जाजू, ग्रेडर, मानोरा,कापूस पणन महासंघ

टॅग्स :washimवाशिमcottonकापूस