शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

जिल्ह्यात कपाशीच्या पेऱ्यात वाढ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 1:02 AM

कृषी विभागाची आकडेवारी: नव्वद टक्क्यांहून अधिक पेरणी आटोपली!

लोेकमत न्यूज नेटवर्कवाशिम: मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांचा कल नगदी पिकाकडे वाढत असल्याने जिल्ह्यातून दरवर्षी कपाशी पेरणीमध्ये सातत्याने घट होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सरासरी ४७४८० हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी अपेक्षीत असताना यंदा २० हजार ९७ हेक्टर क्षेत्रावरच कपाशी पेरल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून कळत असले तरी, मागील वर्षीपेक्षा यंदा कपाशीच्या क्षेत्रात जवळपास दीड हजार हेक्टरची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील मानोरा,मंगरुळपीर व कारंजा तालुक्यात पूर्वी मोठ्या प्रमाणात कपाशीची पेरणी करण्यात येत होती; परंतु लागवडीवर आधारीत भाव न मिळणे, तसेच मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागणे. आदि कारणांमुळे शेतकरी कपाशीकडे पाठ फिरवू लागले. त्यातच या पिकाचा कालावधी अधिक असल्याने रब्बी हंगामातील इतर पिकांची पेरणी शेतकऱ्यांना शक्य होत नाही. या उलट सोयाबीन हे पीक कमी खर्चाचे आणि लवकर होती येणारे असल्याने शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून सोयाबीनवर अधिकाधिक भर देणे सुरू केले. परिणामी जिल्ह्यात कपाशीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कृषी विभागाच्या अंतिम पीक पेरणी अहवालानुसार मागील वर्षी जिल्ह्यात १८ हजार ६३० हेक्टरवर कपाशीचा पेरा झाला होता. आता यंदा सद्यस्थितीत २० हजार ९७ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली आहे. नेहमीप्रमाणे यंदाही मानोरा तालुक्यात सर्वाधिक कपाशीचा पेरा आहे. गतवर्षी मानोरा तालुक्यात ६ हजार २०१ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली होती. त्यात वाढ होऊ यंदा हे क्षेत्र १३ हजार ३०१ हेक्टर झाले आहे. मंगरुळपीर तालुक्यात गतवर्षी ७६३ हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली होती, तर यंदा आतार्यंत ९८० हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली आहे. कारंजा तालुक्यात मात्र कपाशीचा पेरा मोठ्या प्रमाणात घटला असून, गतवर्षी या तालुक्यात ११ हजार १०० हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली होती. ते प्रमाण आता ५२४७ हेक्टरवर आले आहे. तथापि, जिल्ह्याच्या सरासरी ४७४८० हेक्टर क्षेत्रापैकी २००९७ हेक्टर क्षेत्रावर कपाशी पेरण्यात आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत असून मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत १ हजार ४६७ हेक्टरने अधिक असल्यामुळे कपाशीच्या पेऱ्यात वाढ झाल्याचे दिसत आहे.तृणधान्याकडे शेतकऱ्यांची पाठमात्र, शेतकऱ्यांनी ज्वारी , भात,बाजरी व व मका या पिकांकडे पाठ फिरविल्याने यावर्षी केवळ ५ हजार ४१८ हेक्टर आर क्षेत्रावर तृणधान्य पेरणी करण्यात आली. संपूर्णत: निसर्गावर अवलंबून असलेली बिनभरवशाची शेती करताना हमखास उत्पन्न देणा?्या पिकांना प्राधान्य दिल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, उडीद, मुगाच्या पेरणी क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येते.