लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : जिल्ह्यात यंदा २५ आॅक्टोबरपासून तीन ठिकाणी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले; परंतु शासनाने जाहीर केलेला हमीभाव आधीच कमी असताना व्यापा-यांकडूनही चांगले दर मिळत नसल्याने जिल्ह्यातील कापूस अकोला, यवतमाळसारख्या जिल्ह्यात नेण्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.कापूस उत्पादक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शासनाने यंदा अमरावती विभागात २५ आॅक्टोबर पासून ३९ शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. तथापि, शासनाने जाहीर केलेले प्रति क्विंटल ४३२० रुपये दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत अगदीच नगण्य आहेत. विभागातील यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यात व्यापाºयांकडून बºयापैकी दर देण्यात येत आहेत; परंतु वाशिम जिल्ह्यात नेमके शासनाच्या हमीभावापेक्षा शंभर दिडशे रुपये अधिक भाव देऊन शेतकºयांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कापूस उत्पादक शेतकºयांना मात्र हे दर परवडणारे नसल्याने मानोरा, कारंजासह मंगरुळपीर तालुक्यातील अनेक कापूस उत्पादक शेतकरी अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात कापूस नेत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे ७० हून अधिक शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली असतानाही गेल्या महिनाभरात जिल्ह्यातील तिन्ही शासकीय खरेदी केंद्रावर अद्याप क्विंटलभर कापूसही खरेदी झालेला नाही. उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय खरेदी केंद्र सुरु होण्याची प्रतीक्षा लागली आहे.
वाशिम जिल्ह्यातील कापूस जातोय बाहेरच्या जिल्ह्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 6:29 PM
वाशिम जिल्ह्यात यंदा २५ आॅक्टोबरपासून तीन ठिकाणी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले; परंतु शासनाने जाहीर केलेला हमीभाव आधीच कमी असताना व्यापा-यांकडूनही चांगले दर मिळत नसल्याने जिल्ह्यातील कापूस अकोला, यवतमाळसारख्या जिल्ह्यात नेण्यात येत असल्याचे चित्र आहे
ठळक मुद्देअल्पदराचा परिणामहमीभाव वाढविण्याची शेतक-यांची मागणी