या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे प्राचार्य आर.एम.नंदकुले होते. नगराध्यक्षा विजयमाला आसनकर व डॉ. बकाल प्रमुख वक्त्या होत्या. यावेळी पर्यवेक्षक भांडेकर, प्रा. खरात, प्रा. काटे, प्रा. जैन, प्रा. ठाकरे उपस्थित होते. मुलींना दैनंदिन जीवनात येत असलेल्या विविध समस्या या विषयावर प्रमुख वक्त्या डॉ. बकाल यांनी इयत्ता ११ वीतील मुलींना मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे नगराध्यक्षा आसनकर यांनी कोविड -१९ या आजारापासून कशाप्रकारे बचाव करता येईल याबद्दल महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य नंदकुले यांनी मुलींनी विविध समस्यांना कशाप्रकारे सामोरे जावे याबद्दल माहिती दिली. तसेच 'मुलगी ही आपल्या आईवडिलांचा आत्मविश्वास असते' त्याला साजेशी वागणूक मुलींची असावी, आपल्या आईवडिलांच्या विश्वासाला तडा जाणार नाही, असा विश्वास मुलींनी आपल्या पालकांना दिला पाहिजे, असे सांगितले. कोविड-१९ या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे स्वतःची तसेच आपल्या घराची कशी काळजी घ्यावी, या विषयी मार्गदर्शन केले .कार्यक्रमाला ११ वी तील विद्यार्थिनी, प्राध्यापक, प्राध्यापिकांसह शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. संचालन प्रा. जैन यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. काटे यांनी केले.