लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड :निसर्ग आपल्याला भरभरुन देतो. त्याचा दातृत्व गुण आपण आत्मसात करुन दुसर्याला देणं शिकलं पाहिजे. केवळ कोरडा विचार महत्वाचा नसुन तो कृतीत आणनं मह त्वाचे असते. नैसर्गीक आपत्तीच्या वेळी आपण सर्व जण एकत्र येतो, मात्र एरवी आपण आत्म केंद्री बनुन आपल्या व्यवहारात मग्न असतो. भारत माझा देश आहे हे कोरडं देश प्रेम केवळ घशात असुन चालत नाही तर ते कृतीत आणलं पाहिजे असे भावपूर्ण उदगार सिने अभिनेते व नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे यांनी काढले. कारंजा येथे कै.नानासाहेब दहीहांडेकर प्रांगणात सुरु असलेल्या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफतांना ते बोलत होते.त्याचा विषय होत नाम करी काम.प्रारंभी सुधाकर जाधव यांनी वक्त्याचे स्वागत केले तर परिचय रघु वानखडे यांनी केले. आत्महत्याग्रस्त कुटूंबाची सुरु असलेल्या दैन्यावस्थेविषयी बोलताना ते म्हणाले की, आ पल्याला त्यांच्या वेदनेची अनुभूती घेता आली पाहिजे, त्यांच्या वेदनेच्या पातळीवर जावुन आपण त्याच्यासाठी काही तरी केलं पाहिजे, समाजाला माझं काही तरी देणं आहे. या भावनेतुन आम्ही नाम फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेने आतमह त्याग्रस्त कुटूंबांच्या सदस्यांना मदतीचा हात देवुन त्यांना स्वालंबी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. समाजातील खरे जननायक आ पल्याला ओळखता आले पाहिजे, बाबा आमटे, प्रकाश आमटे, रविंद्र कोल्हे ही माणसे खरी नायक आहेत. त्यांचा आदर्श आ पण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. आपल्या कृषी संस्कृतीत दानाला महत्व आहे. शेतकर्यांची बायको दिवस निघाल्यापासून वासुदेवाला दान द्यायची, चिमणीला, दाना टाकायची.मात्र ही संस्कृती अलिकडे लोप पावत चालली आहे. विदेशी अनुकरण ही बाब आपल्या जीवनाची घटक बनली आहे. व्हेलेन्टाईन डे , रोज डे, चॉकलेट डे, आपण साजरे करतो, कशासाठी? शेतकरी डे का साजरा करीत नाही! एवढय़ा महान असलेल्या आपल्या लोक संस्कृतीचा आपण बम्युर्डा करुन टाकल्याची खंत त्यानी व्यक्त केली. आपल्या जीवनात नकारात्मकता ठासुन भरली आहे. आपल्या वर्तनात बदल करायचा असेल तर सकारात्मक भाव निमाृण करा, निर्थक भांडण करण्यापेक्षा आपसात सुसंवाद निर्माण करा, निसर्गाप्रती कृतज्ञता भाव ठेवा, आयुष्य खुप कमी व अधांतरी आहे.त्यामुळे पुढच्या पिढीसाठी आपण काय देवुन जाणार याचा गांभीर्याने विचार करुन जीवनाला सुंदर बनवा असे आवाहन केले. सुत्रसंचालन डॉ.रवि ठाकरे यांनी केले आभार रघु वानखेडे यांनी मानले. डॉ. देशपांडे यांनी शारदा स्तवन म्हटले.
जगण्याचं सृूत्र शिक्षणातून घेतलं पाहिजे - महाजनकारंजा : शिक्षणातुन माणसाचं व्यक्तीमत्व घडायला पाहिजे. माणसाच्या प्रकटीकरणाचं माध्यम म्हणजे शिक्षण होय. मात्र आ पण गुणांसाठी शिक्षण घेत असतो. चांगल कॉलेज मिळावं, चांगली ब्रँच मिळावी, चांगल प्लेसमेंट मिळावं यासाठी आपली धडपड सुरु असते. खरं म्हणजे आपण जगण्याचं सुत्र शिक्षणा तुन घेतलं पाहिजे असे प्रतिपादन जळगाव येथील दिपस्तंभ फाउंडेशन संस्थापक यजुर्वेद्र महाजन यांनी केले ते येथील कै.नानासाहेब दहीहांडेकर प्रांगणात सुरु असलेल्या शरद व्या ख्यानमालेच्या हरिक महोत्सवी वर्षाचे पहिेले पुष्प गुंफताना ते बोलत होते.शिक्षण करीअर व व्यक्तीमत्व विकास हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. प्रारंभी तहसीलदार सचिन पाटील यांनी वक्त्याचे स्वागत केले तर व्याख्यानमालेच्या ६0 वर्षाचा प्रवास आढावा प्रमोद दहीहांडेकर यांनी आपल्या प्रास्ताविकातुन घेतला.वक्तंचा परिचय परमेश्वर व्यवहारे यांनी करुन दिला. श्क्षिण क्षेत्राचं मुल्यमापन करतांना महाजन पुढे म्हणाले की, आज शिक्षणाचे प्रमाण खुप वाढले आहे, खरं म्हणजे शिक्षणाचं प्रमाण वाढलं तर समस्या कमी व्हायला पाहिजे, मात्र दुर्देवान तसं झालं नाही. मुलांच्या करीअर मध्ये पालकांच्या वाढत असलेल्या हस्तक्षे पाबद्दल बोलतांना ते म्हणाले की, सर्व पालक व्यापारी वृत्तीचे बनले आहेत. आपल्या मुलाचं श्क्षिण हे भविष्याची गुंतवणुक म्हणुन ते करीत असतात. त्यामुळे कधी कधी मुलांना जे जमत नाही, जे आवडत नाही ते पालकांच्या सक्तीमुळे करावं लागते. यावेळी त्यांनी दिपस्तंभ या संस्थेतील अंध, अपंग व अनाथ मुलांनी आपलं करीअर कसं घडविलं याचे प्रेरणादायी व्हिडीओ क्लीप दाखविली. प्रारंभी दिवंगत झालेले अरुण साधु व कारंजातील व्याख्यान मालेशी संबंधीत असलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली. व्याख्यानमालेचे ज्येष्ठ कार्यकर्ते बालकिसन मुंदडा यांचा सत्कार करण्यात आला.