आरोग्य अधिकारी एस. बी. बळी, जी. डब्ल्यू. मिटकरी यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षणप्राप्त के. पी. गाडे व दीपाली काळे या परिचारिकांच्या हस्ते लसीकरण करीत आहेत. मोठ्या शहरांसह आता ग्रामीण भागातही काेविड-१९ लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ८ मार्च रोजी शिरपूर येथील आरोग्यवर्धिनी केंद्रावर ६० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. शिरपूर आरोग्यवर्धिनी केंद्रात लसीकरणासाठी दोनशे लस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ८ मार्च रोजी कचरूलाल मुंदडा, गजानन लांडगे, शोभा लांडगे, ओमप्रकाश सोनी, आशा देशमुख, बळीराम गोरे व वसंतराव नगरनाईक यांना सपत्नीक लस टोचण्यात आली. यावेळी आरोग्य कर्मचारी गौरीशंकर पळसकर, अमर झळके, क्षितिज लांडगे हे लसीकरणासाठी आलेल्या लोकांना योग्य ते सहकार्य करीत आहेत.
शिरपूर येथे कोविड लसीकरणाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 4:44 AM