शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
3
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
4
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
5
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
6
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
7
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
8
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
9
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
10
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
12
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
13
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
14
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
15
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
16
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
17
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
18
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
19
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
20
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!

‘कोविशिल्ड’ संपली; ‘कोव्हॅक्सीन’चे केवळ २४ हजार डोज शिल्लक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2021 4:43 AM

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटावर नियंत्रण मिळविणे व नागरिकांना संसर्गापासून सुरक्षित करण्यासाठी जिल्ह्यात १७ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेस सुरुवात ...

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटावर नियंत्रण मिळविणे व नागरिकांना संसर्गापासून सुरक्षित करण्यासाठी जिल्ह्यात १७ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली. याअंतर्गत कोविशिल्डचे ४६ हजार आणि कोव्हॅक्सीनचे ३७ हजार असे एकूण ८३ हजार डोज उपलब्ध झाले होते. त्यापैकी ५२ हजार जणांनी आतापर्यंत लस घेतली असून कोविशिल्डचे डोज संपले आहेत तर कोव्हॅक्सीनचे केवळ २४ हजार डोज सध्या शिल्लक आहेत.

जिल्ह्यात ३ एप्रिल २०२० रोजी कोरोनाने बाधित पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर फेब्रुवारी २०२१ पर्यंत कोरोनाचे रुग्ण वाढत गेले; मात्र आकडा नियंत्रणात होता. दरम्यान, फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यात कोरोना संसर्गाचा अक्षरश: ‘स्फोट’ झाला असून बाधितांचा एकूण आकडा सध्या १६ हजारांपेक्षा अधिक झाला आहे. तसेच कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा आकडाही १८७ वर पोहोचला आहे. दिवसागणिक झपाट्याने वाढत चाललेल्या या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी एकीकडे कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले; तर दुसरीकडे १७ जानेवारीपासून जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिमेसही सुरुवात करण्यात आली आहे.

याअंतर्गत पहिल्या टप्प्यात ५४३३ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला आणि २५७४ कर्मचाऱ्यांना दुसरा डोज देण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात ‘फ्रन्ट लाईन वर्कर्स’पैकी ५८०४ जणांनी पहिला व २२४७ जणांनी लसीचा दुसरा डोज घेतला. ४५ ते ५९ वर्षे या वयोगटातील सुमारे ६ हजार लोकांना लस देण्यात आली असून ५९ पेक्षा अधिक वय असलेल्या २० हजारांपेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांचेही लसीकरण आतापर्यंत पूर्ण झाले आहे. सध्या आरोग्य विभागाकडे कोव्हॅक्सीनच्या दोन हजार डोजचा साठा असून साधारणत: २२ हजार डोज ‘फिल्ड’वर शिल्लक आहेत; तर कोविशिल्ड लस संपली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

..................

बॉक्स :

१ लाख ४० हजार डोजची मागणी

आरोग्य विभागाने यापुढे लसीकरणासाठी कोव्हॅक्सीनचे ६५ हजार आणि कोविशिल्डचे ७५ हजार अशाप्रकारे किमान १ लाख ४० हजार डोजची गरज असून तशी मागणी नोंदविली आहे. शनिवार, ३ एप्रिलपर्यंत लसींचा साठा उपलब्ध होईल, अशी माहिती प्राप्त झाली.

.................

बॉक्स :

दुसरा डोज तूर्तास ‘स्टॉप’

कोरोना लसीचा पहिला डोज घेतल्यानंतर २८ दिवसांनंतर दुसरा डोज घ्यावा लागतो; मात्र सध्या लसींचा तुटवडा निर्माण झाला असून १ एप्रिलपासून ४० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांचेही लसीकरण केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पहिला डोज घेतलेल्या काही लोकांचा दुसरा डोज तूर्तास ‘स्टॉप’ ठेवण्यात आला आहे.

.....................

५२,०००

लोकांनी आतापर्यंत घेतली लस

२४,०००

लसींचे डोज सध्या उपलब्ध

...................

कोट :

जिल्ह्यात सध्या कोविशिल्ड लसीचा तुटवडा आहे; मात्र कोव्हॅक्सीन ही लस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. १ लाख ४० हजार लसची मागणी शासनाकडे नोंदविली असून शनिवारपर्यंत ती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लसीकरण मोहीमेत कुठलाही अडथळा जाणवणार नाही.

- प्रसाद शिंदे

प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम