- साहेबराव राठोडशेलुबाजार (वाशिम) : तो बालपणापासूनच वेडसर असला तरी त्याच्या अंगी माणूसकी असल्याचे अनेकांनी अनुभवले आहे. भीक मागून पोट भरण्यापेक्षा अंगमेहनत करून विशेषत: स्वच्छतेचे व्रत अंगिकारून तो जीवन जगत आहे. केवळ २ रुपयांच्या मोबदल्यात दुकान झाडून देण्याचे काम त्याने स्विकारल्याने त्याच्यातील स्वाभिमानी वृत्तीचे दर्शन घडते. शेलुबाजार (ता.मंगरूळपीर) येथील महादेव भोसले असे नाव असलेल्या या वेडसर व्यक्तीच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सुदृढ आरोग्य आणि मानसिक प्रसन्नता नांदावी, यासाठी प्रथम वास्तव्याचा परिसर सदोदित स्वच्छ राहणे आवश्यक आहे. याचसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची मुहूर्तमेढ रोवली. यामाध्यमातून नागरिकांना स्वच्छतेची सवय लावण्याचे सर्वंकष प्रयत्न सुरू आहे. या मोहिमेत अनेक सामाजिक संघटनांनीही सक्रीय सहभाग नोंदविल्याने स्वच्छतेच्या कार्याला चांगलीच गती प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, सर्वत्र सुरू असलेल्या स्वच्छतेच्या या मोहिमेला नकळत का होईना शेलुबाजार येथील वेडसर महादेव भोसले याचाही हातभार लागत आहे. महादेव हा दररोज सायंकाळच्या सुमारास गावातील दुकाने, हॉटेल्समध्ये जावून संबंधितांकडून केवळ २ रुपये मागतो. त्याबदल्यात हातात झाडू घेवून तो स्वच्छता करून देतो. त्यामुळे संबंधित दुकानदारही त्याला २ रुपये देण्यासाठी कधी नकार देत नाहीत. विशेष बाब म्हणजे महादेव भोसले हा गावात ज्याठिकाणी वास्तव्याला आहे, तेथे त्याने ‘स्वच्छता ठेवा’, असे ठळक अक्षरात लिहून ठेवले आहे. अशा या स्वच्छताप्रेमी महादेवच्या कार्याचे शेलुबाजारात सर्वत्र कौतुक होत आहे. महादेवचे आई-वडिलही होते स्वच्छतेचे सेवेकरी!स्वच्छता हीच सेवा, हा उद्देश बाळगून महादेव भोसलेचे आई-वडिलही शेलुबाजार येथील आठवडी बाजारात शेणा-मातीने ओटे सारवून देण्याचे काम करित असत. त्याबदल्यात मिळणाºया थोड्याथोडक्या पैशांवर कुटूंबाचा चरितार्थ चालत असे. तीच सवय महादेवलाही लागली. आता त्याचे आई-वडिल हयात नाहीत; पण त्यांनी अंगिकारलेले स्वच्छतेचे व्रत महादेवने पुढेही कायम ठेवले.
वेडसर; पण स्वाभिमानी महादेवने अंगिकारले स्वच्छतेचे व्रत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 1:58 PM
शेलुबाजार (वाशिम) : तो बालपणापासूनच वेडसर असला तरी त्याच्या अंगी माणूसकी असल्याचे अनेकांनी अनुभवले आहे. भीक मागून पोट भरण्यापेक्षा अंगमेहनत करून विशेषत: स्वच्छतेचे व्रत अंगिकारून तो जीवन जगत आहे
ठळक मुद्देशेलुबाजार (ता.मंगरूळपीर) येथील महादेव भोसले असे नाव असलेल्या या वेडसर व्यक्तीच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. महादेव हा दररोज सायंकाळच्या सुमारास गावातील दुकाने, हॉटेल्समध्ये जावून संबंधितांकडून केवळ २ रुपये मागतो.ज्याठिकाणी वास्तव्याला आहे, तेथे त्याने ‘स्वच्छता ठेवा’, असे ठळक अक्षरात लिहून ठेवले आहे.