शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मसला पेन ते किनखेडा दरम्यान पैनगंगा नदीमध्ये ६ मार्चच्या रात्री आठ वाजता दरम्यान रेतीचे अवैध उत्खनन सुरू होते. यावेळी तलाठी रवींद्र सूरजलाल पाली हे घटनास्थळावर पोहोचले असता विनानंबर निळ्या रंगाचा ट्रॅक्टरचालक मालकास तीन हजार रुपयाची १ ब्रास भरलेली रेतीसह हा ट्रॅक्टर पोलीस स्टेशनला जमा करण्याचे सांगितले. त्यावर आरोपीने तलाठी पाली यांना दमदाटी करून शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावरून तलाठी रवींद्र पाली यांनी ७ मार्चला शिरपूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. या फिर्यादीवरून शिरपूर पोलिसांनी अशोक द्वारकादास मंत्री यांच्याविरुद्ध कलम ३७९, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला. शिरपूर पोलीस आरोपीच्या व ट्रॅक्टरच्या शोधात मसलापेन येथे रवाना झाले आहेत. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय महाले यांच्या मार्गदर्शनात दामोदर इप्पर हे करत आहेत.
रेती चोरीप्रकरणी ट्रॅक्टरमालकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 4:39 AM