वाशिम : कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह; परंतू सौम्य लक्षणे असलेले रुग्णच तहसिलदारांच्या परवानगीनंतर गृहविलगिकरणात राहत असल्याने जिल्ह्यात आतापर्यंत एकाही रुग्णाचा मृत्यू गृहविलगिकरणात झाला नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. मध्यम व तिव्र स्वरुपाची लक्षणे असलेले रुग्ण शासकीय व खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत.
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. जिल्ह्यात चार हजारावर रुग्ण सक्रिय असून, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना गृहविलगिकरणासाठी तहसिलदारांमार्फत परवानगी दिली जाते. मध्यम व तिव्र लक्षणे असणाºया रुग्णांना कोविड हॉस्पिटलमध्येच दाखल करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदेश आहेत. त्यानुसार जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रशासन, महसूल व आरोग्य विभागाची चमू समन्वयाने गृहविलगिरणातील रुग्णावर वॉच ठेवून आहे. सोबतच पोलीस यंत्रणेचे संरक्षणही आहे. अडीच हजारावर रुग्ण गृहविलगिकरणात असून, आतापर्यंत एकाही रुग्णाचा गृहविलगिकरणात मृत्यू झाला नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
०००
होम क्वारंटाईनमध्ये सर्वाधिक रुग्ण
जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या २३ हजारावर पोहचली आहे. त्यापैकी ४१२७ रुग्ण सक्रिय आहेत. सौम्य किंवा कोणतीही लक्षणे नसलेल्या रुग्णांना गृहविलगिकरणात (होम क्वारंटाईन) ठेवले जात आहे. अडीच हजारावर रुग्ण हे गृहविलगिकरणात आहेत.
००००
गृह विलगिकरणातील रुग्णांवर वॉच
गृह विलगिकरणातील रुग्णांवर स्थानिक स्वराज्य संस्था तसेच आरोग्य विभागाचा वॉच आहे.याशिवाय खासगी डॉक्टरांची सेवा सहजरित्या उपलब्ध होऊ शकेल, अशाच रुग्णांना गृहविलगिकरणात ठेवण्यास परवानगी दिली जाते. ग्रामीण भागात आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांच्याकडून आढावा घेण्यात येतो.
००००
जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण २३८ मृत्यू
वाशिम जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत एकूण २३८ मृत्यू झाले आहेत. यापैकी एकही मृत्यू गृहविलगिकरणात झाला नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्यांची संख्या २३८ अशी आहे. मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णाला गृहविलगिकरणात ठेवण्यात येत नाही, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
००
कोट
कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या; परंतू कोणतेही लक्षणे किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनाच गृहविलगिकरणात ठेवण्यात येते. आरोग्य कर्मचाºयांकडून गृहविलगिकरणातील रुग्णांचा वेळोवेळी आढावा घेतला जातो. आतापर्यत गृहविलगिकरणात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.
- डॉ. अविनाश आहेर,
जिल्हा आरोग्य अधिकारी वाशिम.
००
एकूण रुग्ण २३०४९
बरे झालेले रुग्ण १८६८३
उपचार सुरू असलेले ४१२७
गृहविलगिकरणातील रुग्ण २५९६