शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
3
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
4
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
5
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
6
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
7
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
8
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
9
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
10
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
11
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
12
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
13
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
14
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
15
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
16
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
17
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
18
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
19
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
20
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

पीक विमा काढलेले शेतकरी अहवालाच्या प्रतिक्षेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 2:45 PM

पीक विमा भरणाºया शेतकºयांचा अंतिम अहवाल अद्याप पूर्ण झाला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात आॅक्टोबरच्या अखेर आणि नोव्हेंबरच्या सुरूवातीला आलेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण झाले आणि यातील पीक विमा न भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निधीच्या मागणीचा अहवाल सचिवालयाकडे पाठविण्यात आला; परंतु पीक विमा भरणाºया शेतकºयांचा अंतिम अहवाल अद्याप पूर्ण झाला नाही. प्राथमिक पाहणीत पीक विमा भरणाºया १ लाख ८२ हजार शेतकºयांना अवकाळी पावसाचा फटका बसल्याचे आढळले तरी यातील किती शेतकरी मदतीच्या निकषात बसतात, ते अद्याप निश्चित कळू शकले नाही.जिल्ह्यात २७ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान अवकाळी पावसामुळे शेतातील उभ्या पिकांसह काढणी केलेल्या सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानामुळे हवालदील झालेल्या शेतकºयांना आधार देण्यासाठी शासनाने महसूल व कृषी विभागाला तातडीने पंचनामे पूर्ण करण्याच्या सुचना केल्या. त्यानंतर प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करून ८ नोव्हेंबरपर्यंत पिकांचे पंचनामे पूर्ण केले. तथापि, या पंचनाम्यानंतर पीक विमा न भरणाºया आणि पीक विमा भरणाºया शेतकºयांचे स्वतंत्र अहवाल तयार करण्याची कसरत प्रशासनाला करावी लागली. त्यापैकी पीक विमा न भरणाºया शेतकºयांच्या पंचनाम्यांची डाटा एन्ट्री पूर्ण करून सचिवालयाकडे नुकसानग्रस्त शेतकºयांसाठी आर्थिक मदत म्हणून १९७ कोटी रुपयांची मागणीही नोंदविण्यात आली. कृषी आणि महसूल विभागाच्या पथकाने या शेतकºयांच्या नुकसानाचे पंचनामे केले आहेत. जिल्ह्यात २ लाख ९६ हजार १२५ शेतकºयांनी २ लाख ४ हजार ७८५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचा विमा उतरविला होता. त्यातील १ लाख २६ हजार ७६० शेतकºयांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानापोटी विम्याचा लाभ मिळण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज केले. या अर्जानुसार प्रशासनाने शेतकºयांच्या नुकसानाचे पंचनामेही केले. यानुसार पीक विमा काढणाºया शेतकºयांपैकी ५६ हजार ५२९ शेतकºयांच्या ३२ हजार ३५८ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील उभ्या पिकांचे, तर १ लाख २६ हजार ६८ शेतकºयांच्या १ लाख ४६ हजार ७२ हेक्टर क्षेत्रातील काढणी केलेल्या पिकांचे नुकसान झाल्याचे आढळून आले. अर्थात पीक विमा काढणाºया एकूण १ लाख ८२ हजार ५९७ शेतकºयांच्या १ लाख ७८ हजार ४३० पेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद आहे. तथापि, या शेतकºयांना पीकविम्याच्या निकषानुसार मदत देण्यासाठी सर्वकश अहवाल तयार करावा लागत असून, यासाठी कृषी विभागाची कसरत सुरू आहे. हा अहवाल तयार झाल्यानंतरच नेमक्या किती पीकविमाधारक शेतकºयांना कोणत्या प्रमाणात पीकविमा मंजूर होईल, ते स्पष्ट होऊ शकणार आहे.एनडीआरएफच्या निकषानुसार मदतया शेतकºयांना केंद्र शासनाच्या कृषी विमा कंपनीकडून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक किंवा राज्य आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या (एनडीआरएफ, एसडीआरएफ) निकषानुसार मदत दिली जाणार आहे. त्यात स्थानिक आपत्ती (लोकलाईज्ड रिस्क) आणि काढणी पश्चात झालेले पीक नुकसान (पोस्ट हॉर्वेस्टिंग) अशा दोन प्रकारच्या पीक नुकसानासाठी मदतीचे वेगळे निकषही आहेत. अंतिम अहवालानंतर या दोन प्रकारच्या पीक नुकसानासाठी शेतकºयांना एनडीआरएफ, एसडीआरएफच्या निकषानुसारच पीकविमा मंजूर होणार आहे.पीक विमा न भरणाºयांसाठी पहिल्या टप्प्याची मदतजिल्हयात आॅक्टोबरच्या अखेरीस व नोव्हेंबरच्या सुरुवातीला अवकाळी पावसामुळे पीक नुकसान झाले. यात पीक विमा न भरणााºया परंतु, ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकºयांना आर्थीक मदत म्हणून राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली १८ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या बैठकीत ५६ कोटी ५१ लाख २० हजार रुपयांचा निधी पहिला हप्ता म्हणून मंजुर झाला आहे. प्रत्यक्षात शासनाकडे १९७ कोटीची मागणी नोंदविण्यात आली आहे.

 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाwashimवाशिम