------------------
फाट्यावरील हातपंपाचा वाटसरूंना आधार!
वनोजा : येथील फाट्यावरील हातपंप गत अनेक दिवसांपासून बंद होता. ये-जा करणाऱ्या वाटसरूंना हातपंपावर पिण्यासाठी पाणी मिळावे, यासाठी हा हातपंप दुरुस्त करण्यात आला असून, त्याचा वाटसरूंना मोठा आधार होत आहे.
---------------
उंबर्डा येथे स्वच्छतेबाबत मार्गदर्शन
वाशिम : उंबर्डा बाजार येथे रस्त्यावर कचरा टाकण्यात येत असल्याने गावात घाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरपंचांच्या मार्गदर्शनात ग्रामसचिवांनी सभा घेऊन स्वच्छता राखण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.
-----
मानोरा मार्गावर वाहनांची तपासणी
चौसाळा : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर नियंत्रणासाठी कारंजा- मानोरा मार्गावर दुचाकी वाहनांची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे. याअंतर्गत सोमठाणा चेकपोस्ट पोलिसांनी वाहनांची मंगळवारी कसून तपासणी केली.
------
घरच्या बियाण्यांवर प्रक्रिया
वाशिम : बियाणे आणि खतांच्या दरात यंदा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रामुख्याने सोयाबीन, मूग आणि उडिदाच्या बियाण्यांचे दर वाढल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळेच यंदा देपूळ परिसरातील शेतकरी घरचे बियाणे वापरण्यावर भर देत आहेत.