शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

वाशिम जिल्ह्यात पीककर्ज वाटप केवळ १५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 2:59 PM

वाशिम : खरीप हंगामाला सुरूवात होत असतानाही, जिल्ह्यातील केवळ २८ हजार ५४६ शेतकऱ्यांना २३५ कोटी ९ लाखांचे पीककर्ज वाटप झाले असून, याची टक्केवारी १५.३७ अशी येते.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : खरीप हंगामाला सुरूवात होत असतानाही, जिल्ह्यातील केवळ २८ हजार ५४६ शेतकऱ्यांना २३५ कोटी ९ लाखांचे पीककर्ज वाटप झाले असून, याची टक्केवारी १५.३७ अशी येते.२०१८ या वर्षात पावसाने दगा दिला. त्यानंतर परतीच्या पावसानेदेखील शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला. विविध कारणांमुळे खरीप व रब्बीचे समाधानकारक पीक हाती आले नाही. संकटांची ही मालिका कमी म्हणून की काय, यात शेतमालाच्या अल्प बाजारभावाची भर पडली. सोयाबीनचे उत्पादन घटले; मात्र बाजारभावही गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी आहेत. चोहोबाजूंनी आलेल्या चक्रीवादळात अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी कोलमडून गेला. आता पुन्हा नव्या उमेदीने खरिप हंगामातील पेरणीसाठी उभे राहण्याचा प्रयत्न शेतकरी करीत असताना, काही राष्ट्रीयकृत बँकांकडून पीककर्ज वितरणासाठी फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे शेतकºयांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.जिल्ह्यात चालू खरिप हंगामात १ लाख ९३ हजार ८९० शेतकºयांना १५३० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, १२ जूनअखेर यापैकी २८ हजार ५४६ शेतकºयांना २३५ कोटी ९ लाखांचे पीककर्ज वाटप झाले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ५०४ कोटी रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट असून, या बँकेने आतापर्यंत ३४.०७ टक्के पीककर्ज वाटप केले आहे.अलाहाबाद बँक, बँक आॅफ बडोदा, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, इंडीयन ओव्हरसीस बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक आॅफ इंडिया, सिंडीकेट बँक, युको बँक, युनियन बँक आॅफ इंडिया, देना बँक आदी राष्ट्रीयकृत बँकांना ९० हजार २२६ शेतकºयांसाठी ७१४ कोटी २० लाख रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. १२ जूनपर्यंत ४४४० शेतकºयांना ३८ कोटी ४३ लाख ५४ हजार रुपयांचे पीककर्ज वाटप केले असून, याची टक्केवारी ५.३८ अशी येते.अ‍ॅक्सिस, एचडीएफसी, आयसीआयसीआय व आयडीबीआय अशा चार खासगी बँकांना ७७.७० कोटींचे पीककर्जाचे उद्दिष्ट दिले असून, १२ जूनपर्यंत ७३९ शेतकºयांना ११ कोटी २६ लाख २७ हजार रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले. याची टक्केवारी १४.५० अशी येते. एचडीएफसी बँकएचडीएफसी बँकेने आतापर्यंत ३५.४२ टक्के पीककर्ज वाटप करून आघाडी घेतली आहे. ३३८५ शेतकºयांना १९.६० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून, १२ जूनपर्यंत २९७ शेतकºयांना ६ कोटी ९४ लाख २२ हजाराचे पीककर्ज वाटप केले. बँक आॅफ बडोदा या राष्ट्रीयकृत बँकेचा अपवाद वगळता उर्वरीत बँकांना पीककर्ज वाटपाच्या टक्केवारीचा दुहेरी आकडाही गाठला आला नाही.जिल्हा मध्यवर्ती बँकशेतकºयांची बँक म्हणून अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे पाहिले जाते. २०१९ या वर्षात या बँकेला ५०४ कोटी रुपये खरिप पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. १२ जूनपर्यंत २१ हजार ९२१ शेतकºयांना १७१ कोटी ९२ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले असून, याची टक्केवारी ३४.०७ अशी येते.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जagricultureशेतीFarmerशेतकरीwashimवाशिम