विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा लोणी बु.चे व्यवस्थापक हे ११ एप्रिलपासून आजारी रजेवर आहेत. बँकेच्या वरिष्ठ कार्यालयाने प्रतिनियुक्तीवर व्यवस्थापक नियुक्त करणे आवश्यक होते; परंतु तसे न केल्यामुळे लोणी बु., लोणी खु., असोला, मोप आदी गावांतील अनेक शेतकऱ्यांना पीक कर्जपुरवठा होणे तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज भरले त्यावरील व्याज, वाढीव रक्कम मिळणे, नवीन पीक कर्ज वाटप प्रलंबित आहे. याप्रकरणी लोणी बु. ग्रामपंचायतीचे सदस्य विनोद बोडखे यांच्यासह शेतकऱ्यांनी बँकेच्या रोखपाल यांना घेराव घालून निवेदन सादर केले होते. ‘लोकमत’नेदेखील वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत वाशिम येथील ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक हे मागील ३ दिवसांपासून लोणी शाखेला येऊन शेतकऱ्यांचे कर्ज प्रकरणे निकाली काढत आहेत. त्यामुळे लोणी बु. परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
विदर्भ ग्रामीण बँकेकडून पीक कर्ज वाटप सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 4:43 AM