शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
5
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
6
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
7
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
8
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
10
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
11
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
12
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
13
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
14
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
15
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
16
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
17
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
18
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
19
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
20
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?

पीक कर्ज वसुलीचे प्रमाण नगण्य!

By admin | Published: May 16, 2017 1:51 AM

शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा : २०१६-१७ मधील वाटप ८९० कोटी; वसूल झाले २५० कोटी!

सुनील काकडे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गतवर्षीच्या खरीप हंगामात जुलै-२०१६ पर्यंत जिल्ह्यातील विविध बँकांनी शेतकऱ्यांना ८९० कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले. मात्र, यंदा शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन पूर्णत: कोलमडल्याने ही रक्कम वसूल करताना बँकांची चांगलीच कसरत होत आहे. २०१७ चा खरीप हंगाम ऐन तोंडावर आला असताना, ८९० कोटी रुपयांपैकी जेमतेम २५० कोटी रुपयांच्या आसपास रक्कम वसूल झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी सोमवार, १५ मे रोजी दिली.गतवर्षीच्या खरीप हंगामात प्रशासनाने ९५० कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविले होते. त्यापैकी प्रत्यक्षात जुलै २०१६ अखेर जिल्ह्यातील ९८ हजार ७२१ शेतकऱ्यांना ८९० कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. ३१ मार्च २०१७ पूर्वी कर्जाची रक्कम अदा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शून्य टक्के व्याज सवलत योजनादेखील अंमलात आणल्या गेली. मात्र, २०१६ च्या खरीप हंगामातील सोयाबीनला मिळालेले अल्प दर, नोव्हेंबर २०१६ मध्ये अचानक झालेला नोटाबंदीचा निर्णय आणि रब्बी हंगामात पिकविलेल्या तुरीला तुलनेने मिळालेले अल्प दर व नाफेडने शेतकऱ्यांप्रती अवलंबिलेले उदासीन धोरण, या चक्रव्यूहात फसलेल्या जिल्ह्यातील अधिकांश शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. अशातच विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीचे रणशिंग फुंकून ‘चांदा ते बांदा’ संघर्ष यात्रा काढली. ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलने झाली. यामुळे निश्चितपणे कर्जमाफी मिळेल, अशी भाबडी आशा बाळगून असलेल्या असंख्य शेतकऱ्यांनी पीक कर्जाची रक्कम अदा करण्यास विलंब केला आहे. त्याचा थेट परिणाम वसुलीवर झाला असून, ८९० कोटींपैकी १५ मे अखेर केवळ २५० कोटी रुपये वसूल करण्यात बँकांना यश मिळाले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेची वसुली केवळ ३८ टक्के२०१६-१७ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील अलाहाबाद बँक, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, स्टेट बँक आॅफ इंडिया, युनियन बँक आॅफ इंडिया, विदर्भ कोकण ग्रामीण बँक यासह अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केले. त्यापैकी एकट्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पीक कर्जाचा आकडा तब्बल ४२४ कोटी रुपये असून, १५ मे अखेरची वसुली मात्र केवळ १६१ कोटी रुपये असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तथापि, २०१६-१७ मधील पीक कर्जाची रक्कम थकबाकीदार शेतकऱ्यांकडून वसूल करण्यासोबतच २०१७-१८ मधील पीक कर्ज वाटपाचे आवाहन बँकेला पेलावे लागत आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जवसुलीसाठी युद्धस्तरावर प्रयत्न केले. शून्य टक्के व्याज सवलत योजनाही राबविण्यात आली. मात्र, शेतकऱ्यांमधून त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळेच वसुलीचे प्रमाण कमी राहिले.- ज्ञानेश्वर खाडे, जिल्हा उपनिबंधक, वाशिम