लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : खरीप हंगामात अवघ्या २२ टक्क्याच्या आसपास पीककर्ज वाटप करणाºया बँकांनी, रब्बी हंगामातील पीककर्ज वाटपास अद्याप सुरूवात केली नाही. रब्बी हंगामातील पीककर्ज वाटपाला सुरूवात केव्हा होणार? याकडे शेतकºयांचे लक्ष लागून आहे.शेतकºयांना नानाविध प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागत असून, शेती मशागत, पीक पेरणी, फवारणी व अन्य शेतीविषयक कामे पैशाअभावी खोळंबू नये म्हणून शेतकºयांना पीककर्ज वाटप केले जाते. यावर्षीच्या खरिप हंगामात १४७५ कोटी रुपयांचे पीककर्जाचे वाटप असतानाही प्रत्यक्षात २२ टक्क्यांच्या आसपासच पीककर्ज वाटप झाले. आता रब्बी हंगाम तोंडावर असल्याने शेतकºयांना पीककर्ज वाटपाची प्रतिक्षा आहे. खरिप हंगामात सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट आल्याने आणि हमीभावाने शेतमालाची खरेदी नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पृष्ठभूमीवर रब्बी हंगामात शेतकºयांना पीककर्ज वाटपाची प्रतिक्षा आहे. आॅक्टोबर महिन्यात पीककर्ज वाटप सुरू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अद्याप पीककर्ज वाटपाला सुरूवात झाली नसल्याने याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी जि.प. सदस्य विकास गवळी यांनी बुधवारी केली.
रब्बी हंगामातील पीककर्ज वाटपाला सुरूवातच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 3:52 PM