गेल्या दोन-तीन दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण तथा हवामान खात्याने आधीच दिलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीच्या इशाऱ्याने गहू-हरभरा उत्पादक शेतकरी वर्गाने हारवेस्टरच्या साहाय्याने गहू काढणीला युद्धपातळीवर सुरुवात केली होती. मात्र, १८ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह गारा व पावसाने उंबर्डा बाजारसह परिसरातील गहू हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सोसाट्याचा पाऊस व गारपिटीची पटवारी मुंडाळे तथा कृषी सहायक सचिन उदयकर यांनी तातडीने दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतीची घटनास्थळी जाऊन पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष राजू पाटील गाडवे यांनी केली आहे.