वाशिम - सोयाबीन, कापूस, तूर व हरभरा या प्रमुख पिकांसह आता आंबा, डाळींब, केळी, मोसंबी, संत्रा व चिक्कू या फळपिकांवरील कीड व रोगाच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिने सन २०१८-१९ या वर्षात कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) राबविण्यात येणार आहे. कापूस उत्पादक जिल्ह्यांतील ५४५ मंडळातील शेतकºयांसाठी एक दिवसाचे प्रशिक्षणही आयोजित केले जाणार आहे.पिकांवरील कीड व रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिने कृषी विभागातर्फे यापूर्वी सोयाबीन, कापूस, भात, तूर व हरभरा या प्रमुख पिकांवरील कीड व रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिने कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) राबविण्यात येत होता तर आंबा, डाळींब, केळी, मोसंबी, संत्रा व चिक्कू या फळपिकांसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ‘हॉर्टसॅप’ प्रकल्प राबविण्यात येत होता. क्रॉपसॅप व हॉर्टसॅप या दोन्ही प्रकल्पांची कार्यपद्धती एकसमान असल्याने दोन स्वतंत्र योजना न राबविता यावर्षीपासून अर्थात सन २०१८-१९ पासून दोन्ही योजना एकत्रित राबविण्यात येणार आहे. ‘एकत्रित क्रॉपसॅप’ योजना राबविण्याची रुपरेषा तयार झाली असून, या योजनेंतर्गत ४१.४७ कोटी रुपयांच्या निधीच्या कार्यक्रमास शासनस्तरावर प्रशासकीय मान्यतादेखील मिळाली आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. एकत्रित क्रॉपसॅप योजनेमध्ये सोयाबीन, कापूस, तूर व हरभरा यासह आंबा, डाळींब, केळी, मोसंबी, संत्रा व चिक्कू या फळपिकांचा समावेश असून, कीड व रोगाच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिने शेतकºयांना मार्गदर्शन केले जाणार आहे. या योजनेकरीता संगणक प्रणाली विकसित केली असून, कृषी सहायक व कृषी पर्यवेक्षक यांची स्काऊट म्हणून तर मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांची त्यांच्या अधिनस्त कार्यक्षेत्रासाठी पर्यवेक्षकीय अधिकारी म्हणून नोंदणी केली जाणार आहे. त्यानंतर ऐच्छिक पद्धतीने कीड व रोग सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविली जाणार आहे. खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी संगणकीय प्रणालीबाबतचे परिपूर्ण प्रशिक्षण कृषी सहायक व कृषी पर्यवेक्षक तसेच पर्यवेक्षकीय अधिकाºयांना दिले जाणार आहे. या योजनेंतर्गत शेतकºयांचादेखील सहभाग वाढविला जाणार आहे. संबंधित पिकांच्या विकासाच्या विविध महत्त्वपूर्ण टप्प्यावर कीड व रोगाचे प्रमाणआर्थिक नुकसान पातळीवर पोहोचण्यापूर्वी, संबंधित नेमून दिलेल्या गावातील पिकांचे नमुने घेऊन त्याची तपासणी व सर्वेक्षण नियमित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच संबंतिध पीक क्षेत्राच्या गाव व तालुका स्तरावर शेतकºयांना आवश्यक सल्ला मोबाईल एसएमएसद्वारे देण्याची व सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र सभा, बैठका व प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्याची जबाबदारी ही कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षकांवर सोपविण्यात आली आहे. कापूस उत्पादक जिल्ह्यांतील ५४५ मंडळातील जे कापूस उत्पादक शेतकरी व ‘आत्मा’ अंतर्गत शेतकरी मित्र हे शेंदरी बोंड अळी व्यवस्थापनाकरिता स्वखर्चाने फेरोमेन सापळा लावून शासनास कीड व रोग प्रादुर्भावाबाबत माहिती सादर करतील, त्यांच्याकरिता एक दिवसाचे प्रशिक्षणही आयोजित केले जाणार आहे.शासन परिपत्रक व वरिष्ठांच्या सुचनेनुसार ‘एकत्रित क्रॉपसॅप’ योजनेची वाशिम जिल्ह्यात अंमलबजावणी केली जाईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी सांगितले.
‘क्रॉपसॅप’ योजनेची व्याप्ती वाढली ; आंबा, डाळींब, संत्रा फळपिकांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 1:50 PM
वाशिम - सोयाबीन, कापूस, तूर व हरभरा या प्रमुख पिकांसह आता आंबा, डाळींब, केळी, मोसंबी, संत्रा व चिक्कू या फळपिकांवरील कीड व रोगाच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिने सन २०१८-१९ या वर्षात कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) राबविण्यात येणार आहे.
ठळक मुद्देक्रॉपसॅप व हॉर्टसॅप या दोन्ही प्रकल्पांची कार्यपद्धती एकसमान असल्याने दोन स्वतंत्र योजना न राबविता एकत्रित राबविण्यात येणार आहे. कीड व रोगाच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिने शेतकºयांना मार्गदर्शन केले जाणार आहे. नेमून दिलेल्या गावातील पिकांचे नमुने घेऊन त्याची तपासणी व सर्वेक्षण नियमित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.