शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
3
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
4
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
5
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
6
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
7
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
8
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
9
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
10
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
11
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
12
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

शिरपुरात बँकेसमोर नागरिकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 5:22 PM

फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम पायदळी तुडवून नागरीक गर्दी करीत असल्याचे २९ एप्रिल रोजी बँक  परिसर व गावातील बाजारपेठेत दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : जिल्हा कोरोनामुक्त झाला असला; तरी संभाव्य कोणताही धोका नको म्हणून लॉकडाउन व संचारबंदीची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, शिरपूर येथे फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम पायदळी तुडवून नागरीक गर्दी करीत असल्याचे २९ एप्रिल रोजी बँक  परिसर व गावातील बाजारपेठेत दिसून आले.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. शिरपूर येथील आठवडी बाजारात नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून भाजीपाला बाजाराची विभागणी करण्यात आली आहे. तीन, चार ठिकाणी भाजीबाजार भरत असल्याने पूर्वीच्या तुलनेत आता गर्दी कमी झाली आहे. दुसरीकडे विविध योजनेंतर्गतचे अनुदान काढण्यासाठी लाभार्थींची राष्ट्रीयकृत बँकेत गर्दी होत आहे. २० एप्रिलनंतर संचारबंदीतून अत्यावश्यक सेवा, कृषीशी निगडीत सेवांना शिथीलता मिळाल्याने शिरपूर येथे जणू काही संचारबंदी हटली, या अविर्भावात काही नागरिक वावरत असल्याचे २९ एप्रिल रोजी दिसून आले. सार्वजनिक ठिकाणी, बँकेसमोर तसेच बाजारपेठेत गर्दी होऊ नये याची दक्षता घेण्याच्या सूचना तालुका प्रशासनाने स्थानिक प्रशासन, बँक प्रशासनाला दिलेल्या आहेत. मात्र, तरीही गर्दी होत असल्याने कोरोना विषाणू संसर्गाची साखळी कशी तुटणार, असा सवाल उपस्थित होत आहे. शिरपूर येथील राष्ट्रीयकृत बँकांसमोरील गर्दी हटता हटेना, अशी परिस्थिती आहे. फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालनही होत नसल्याने कोरोना विषाणू संसर्गाबाबत नागरीक फारसे गंभीर नसल्याचे दिसून येते. शिरपूर येथील बाजारपेठ व बँक परिसरात गर्दी होणार नाही यासाठी पोलीस कर्मचारी किंवा होमगार्ड तैनात करणे आवश्यक ठरत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे अपेक्षीत आहे. आमची बँक राष्ट्रीयकृत असल्याने शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थींचे अनुदान बँंक आॅफ महाराष्ट्र शाखा शिरपूरमार्फत वाटप होते. अनुदान घेण्यासाठी गर्दी होत आहे. आम्ही फिजिकल डिस्टन्सिंगबाबत स्वत: पुढाकार घेऊन ग्राहकांना आवाहनही करीत आहोत. गर्दी होऊ नये म्हणून एका व्यक्तीकडे जबाबदारीही सोपविली आहे. मात्र तरीदेखील कधी-कधी लाभार्थी गर्दी करतातच. कार्यालयीन वेळेत बँकेसमोर एखादा पोलीस कर्मचारी किंवा होमगार्ड तैनात केला तर गर्दी आटोक्यात येऊ शकेल.- शशी कुमार, व्यवस्थापकबँक आॅफ महाराष्ट्र, शिरपूर शाखा कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, गावात गर्दी करू नये.- बी.पी. भुरकाडे, ग्रामसचिवग्रामपंचायत, शिरपूर ता.मालेगाव

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन