वाशिम : कोरोनाकाळातही वाशिम तालुक्यातील एकबुर्जी प्रकल्पावर गर्दी होत असल्याचे पाहून रविवार, ८ आॅगस्ट रोजी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. प्रकल्पात पोहणाºया काही युवकांना पोलिसांनी चांगलाच चोप देत गर्दी न करण्याचा सल्ला दिला.कोरोनाकाळात गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनातर्फे केले जात आहे. वाशिम शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या एकबुर्जी प्रकल्प परिसरात पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी होत असते. एकबुर्जी प्रकल्प ओव्हरफ्लो होत असून, पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी अनेकजण तेथे गर्दी करीत आहेत. दरम्यान या परिसरात वाहन पार्किंगची वसुली केली जात असून, वाहनधारकांना कोणत्याही प्रकारची पावती दिली जात नसल्याचेही समोर येत आहे. रविवारी पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली असता, अनेकजण पोहताना तसेच गर्दी करताना दिसून आले. यावेळी काही युवकांना चोप देत पुन्हा गर्दी न करण्याचा सल्ला पोलिसांनी दिला.
एकबुर्जी धरणावर गर्दी; पोलिसांनी युवकांना दिला चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2021 5:36 PM