--------------------
बाजार समितीत निर्जंतुकीकरण
वाशिम: जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीत शेतमाल घेऊन येणारे शेतकरी व इतर घटकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. यासाठी मंगळवारी वाशिम बाजार समितीत संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात आले.
--------------------
एकबुर्जी प्रकल्पात ३८ टक्के साठा
वाशिम: शहराला पाणी पुरवठा करणाºया एकबुर्जी प्रकल्पातील जलसाठ्यात मोठी घट येत आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पात ३८ टक्के उपयुक्त साठा असला तरी सिंचनासाठी उपसा होत असल्याने पुढे पातळी खालावून पाणी पुरवठा प्रभावित होण्याची भिती आहे.
^^^^^
लोकसहभागातून जलसंधारणाची कामे
वाशिम: जिल्ह्यात प्रशासनाकडून जलसंधारण मॉडेल योजना राबविली जात आहे. या योजनेत भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) सहकार्याने लोकसहभागातून जलसंधारणाची विविध कामे केली जात असून, मालेगाव तालुक्यातील तिवळी येथे बुधवारी जलशोषक चर कामाला सुरुवात करण्यात आली.