लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत २ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या कर्ज खात्यांचे आधार प्रमाणिकीकरण केले जात आहे. त्यासाठी जिल्ह्यातील आधार केंद्रांवर सोमवार, २ मार्च रोजी शेतकºयांची तोबा गर्दी झाल्याचे दिसून आले.महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात गतीमान झाली आहे. याअंतर्गत १ मार्चपर्यंत १ लाख ४२३ शेतकºयांची कर्ज खाती पोर्टलवर अपलोड झाली असून त्यापैकी ८३ हजार ६३४ कर्ज खात्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे. १७ हजार ७०६ शेतकºयांच्या कर्ज खात्यांचे प्रमाणिकीकरण झाले असून सोमवार, २ मार्चपासून उर्वरित ६५ हजार ९२८ शेतकºयांच्या कर्ज खाती प्रमाणिकीकरणास सुरूवात झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात महा-आॅनलाईनचे १० आधार केंद्र कार्यान्वित असून १०९३ आपले सरकार सेवा केंद्रांसह बँकांमध्येही आधार प्रमाणिकीकरणाची सोय प्रशासनाचे उपलब्ध करून दिलेली आहे. सोमवारी बहुतांश केंद्रांवर शेतकºयांची गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निकष पूर्ण करून पात्र ठरणाºया शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.
वाशिम जिल्ह्यातील आधार केंद्रांवर प्रमाणिकीकरणासाठी शेतकऱ्यांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2020 2:10 PM