वाशिम : जिल्ह्यात काेविड प्रतिबंधक लसीकरण माेहिमेला वेग आला आहे. माेहिमेंतर्गत लसीकरण करण्यात येत असून जिल्ह्यात कुठेही खासगी लसीकरण केंद्रच नसल्याने शासकीय केंद्रावरच गर्दी हाेताना दिसून येत आहे. काेराेना संसर्ग वाढलेला असताना वाशिम शहरात मात्र खासगी लसीकरण केंद्र हाेते, तेव्हा काही जणांनी खासगी केंद्रावर लस घेतली आहे.
खासगी लसीकरण केंद्रावर पैसे देऊन लस घेण्याला नागरिकांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने आजच्या घडीला खासगी लसीकरण केंद्रच नाही. यामुळे शासकीय लसीकरण केंद्रावरील गर्दीवरून दिसून येते. डेल्टा प्लसच्या निमित्ताने तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नागरिक लसीकरणाला प्राधान्य देत आहेत. आराेग्य विभागाकडून गावाेगावी जाऊनही शिबिर घेण्यात येत आहे.
---------
म्हणून शासकीय रुग्णालयांतच लस
राज्यात काही ठिकाणी नागरिकांना बनावट लस देण्यात आल्याची चर्चा ऐकण्यात हाेती, त्यामुळे मनात भीती हाेती.
शासकीय केंद्रावर गर्दी असली तरी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने लसीकरण करण्यात आल्याचे सांगण्यात येत हाेते.
वाशिम येथे काेराेना नियमांचे पालन करून याेग्य पद्धतीने शासकीय लसीकरण केंद्रावर लस देण्यात येत हाेती.
खासगी लसीकरण केंद्र कुठे आहे याची कल्पनाच नसल्याने व तेथे काेविशिल्डची लस उपलब्ध असल्याचे दिसून आले.
............
लसीकरणासाठी जाताना खबरदारी घेताहेत नागरिक
काेराेना संसर्ग वाढत असताना शहरात खासगी केंद्र हाेते. परंतु, आता खासगी केंद्र कुठे आहे, याची काेणालाच कल्पना नसल्याने शासकीय केंद्रावरच लस घेतली आहे.
- गाैरव गायकवाड, वाशिम
गावाेगावी आराेग्य विभागाकडून लसीकरण शिबिर घेण्यात येत आहे. आमच्या परिसरातही लसीकरण शिबिर झाले हाेते. त्यामध्येच आम्ही परिवाराने लस घेतली.
- सुरेश वलाेकार, काेठारी