कोरोना रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शासन विविध उपाययोजना करीत आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी गर्दी टाळणे महत्त्वाचे असल्याने शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे; परंतु शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतरही दुकाने सुरू असल्याचे पाहायला मिळाले. पालिका, पोलिसांचे वाहन आल्यावर अनेक दुकानदार तेवढ्यापुरते दुकान बंद करतात व पथक गेले की पुन्हा सुरू करतात. आरोग्य विभाग, पोलीस विभाग, पालिका, महसूल विभाग हे कोरोना नियंत्रणासाठी परिश्रम घेत असताना नागरिकांनी सुद्धा प्रशासनास सहकार्य करण्याची गरज आहे; परंतु विनाकारण लोक रस्त्यांवर येत असल्याने गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी आता हाती दंडुका घेण्याची गरज आहे.
मंगरुळपीर येथे रस्त्यांवर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 4:41 AM