कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सोमटकर होते. शिक्षक आमदार अॅड. किरण सरनाईक, भाऊसाहेब काळे, देविदास नागरे, अनिल गवळी, अशोक कांबळे, धनंजय रोठे, अभिमान खाजभागे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. कोणी कुठे जन्म घेतला तरी सर्वचजण बुद्धिमान असतात, असे सांगून शिक्षणाधिकारी म्हणाले, विद्यार्थ्यांना सतत नाविणन्यपूर्ण वाचनाची आवड असायला हवी. शाळा ही साखर कारखान्यासारखी असते. जशी कारखान्यातून चांगली साखर बाहेर पडते तसेच शाळेतूनही चांगले, सुसंस्कृत विद्यार्थी बाहेर पडायला हवेत. आपला हेतू, संकल्प कधीच थांबवू नका, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारायण काळबांडे यांनी केले. त्यांनी भाषणातून जिजाऊ - सावित्री दशरात्रोत्सवामागील उद्देश विषद केला. सूत्रसंचालन प्रा. राठोड यांनी केले. प्रा. संतोष सरोदे यांनी आभार मानले. काळबांडे व प्रा. बाळासाहेब गोटे यांनी गायिलेल्या राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.