शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

संचारबंदीत दुकाने कडकडीत बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 4:48 AM

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शनिवारी सायंकाळी ५ वाजतापासून लागू झालेल्या संचारबंदीत रविवारी जिल्ह्यातील बाजारपेठ कडकडीत बंद ...

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शनिवारी सायंकाळी ५ वाजतापासून लागू झालेल्या संचारबंदीत रविवारी जिल्ह्यातील बाजारपेठ कडकडीत बंद राहिल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. अत्यावश्यक सेवा आणि प्रवासी वाहतुकीचा अपवाद वगळता घराबाहेर कुणी पडले नसल्याचे दिसून आले.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिले आहेत. त्यानुसार वाशिम जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी २१ फेब्रुवारी रोजी संचारबंदीचा सुधारित आदेश जारी केला. त्यानुसार आठवड्याअखेर शनिवारी सायंकाळी ५ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत संचारबंदी असून, या दरम्यान जिल्ह्यातील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. यामधून दवाखाने, मेडिकल्स, दुग्धविक्रेते/डेअरी, प्रवाशी वाहतूक व ऑटो वाहतूक आदींना वगळण्यात आले. शनिवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजतापासून लागू झालेल्या संचारबंदीत रविवार, २८ फेब्रुवारी रोजी दिवसभर जिल्ह्यातील संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. वाशिमसह रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर व मानोरा शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित सर्व दुकाने बंद होती. दरम्यान, प्रवासी वाहतूक सुरू असल्याने रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहनांचा प्रवासही सुसाट असल्याचे पाहावयास मिळाले. प्रमुख चौकांमध्ये चोख पोलीस बंदोबस्त असल्याने नागरिकांची वर्दळ दिसून आली नाही.

बॉक्स

प्रमुख शहरांमध्ये शुकशुकाट

संचारबंदी आदेशाचे पालन म्हणून वाशिम, रिसोड, मालेगाव, कारंजा, मानोरा, मंगरूळपीर या प्रमुख शहरांसह शेलुबाजार, अनसिंग, शिरपूर, कामरगाव, धनज, शेंदुरजना अढाव, मेडशी, रिठद आदी गावांमधील बाजारपेठ कडकडीत बंद असल्याने शुकशुकाट दिसून आला.

बॉक्स

नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कारवाई

संचारबंदी आदेश आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी काही जणांवर दंडात्मक कारवाईदेखील करण्यात आली. वाशिम शहरात शहर वाहतूक शाखेतर्फे जवळपास ४० जणांवर दंडात्मक कारवाई केली.