शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

ग्राहकांनी जागृत होणे गरजेचे- बेडसे

By admin | Published: March 16, 2017 3:01 AM

जागतिक ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रम.

वाशिम, दि. १५- ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा प्रमुख घटक आहे. ग्राहकांचे शोषण व फसवणूक रोखण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. या कामाला गती मिळण्यासाठी ग्राहकांनी जागृत होणे आवश्यक असल्याचे मत अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालय व ग्राहक पंचायत यांच्यावतीने जागतिक ग्राहक दिनानिमित्त बुधवारी पार पडलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे वाशिम जिल्हाध्यक्ष प्रमोद गंडागुळे, सहसंघटक प्रा. सुधीर घोडचर, उ पजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल खंडागळे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेश गिरी, कैलास वानखडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. अपर जिल्हाधिकारी डॉ. बेडसे म्हणाले की, ग्राहकांची फसवणूक होण्याचे अनेक प्रकार पाहावयास मिळतात. अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून अन्न पदार्थात होणारी भेसळ रोखण्यासाठी प्रयत्न होतात, तसेच वैधमापन विभागामार्फतही ग्राहकांची फसवणूक केली जाऊ नये, याची काळजी घेतली जाते. ग्राहकांनी स्वत:ही याविषयी जागृत होऊन आपले हक्क व अधिकारांची माहिती घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले, तसेच अन्न व औषध प्रशासनामार्फत भेसळ रोखण्यासाठी धडक मोहीम उघडावी. यामध्ये होणार्‍या कारवाईला व्यापक प्रसिद्धी द्यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. प्रा. घोडचर यांनीही यावेळी अन्न पदार्थामधील भेसळ ओळखण्याच्या सोप्या पद्धती पीपीटीद्वारे समजावून सांगितल्या; तसेच गंडागुळे यांनी ग्राहकांच्या हितासाठी ग्राहक पंचायत करीत असलेल्या कार्यांची माहिती दिली, तसेच ग्राहक संरक्षण समितीची कार्यपद्धती विषद केली.