निवडणुकीत भाजपातर्फे रुपाली महेश राऊत, शिवसेना गौरी रवी पवार, राष्ट्रवादी सुरेखा यशवंतराव इंगळे, इंदिरा काँग्रेस विजयाताई संदीप जाधव, वंचित बहुजन आधाडी छाया मनोहर राठोड, प्रहार जनशक्ती पक्ष मनीषा श्याम पवार तर अपक्ष विजया तायडे असे उमेदवार आहेत.
ओबीसी आरक्षण जास्त असल्याने ओबीसी आरक्षणमध्ये निवडून आलेल्या रुपाली महेश राऊत यांचे पद रिक्त झाल्यामुळे आता पुन्हा निवडणूक जाहीर झाल्याने येत्या १९जुलैला मतदान होणार आहे. त्याकरिता कोंडोली, आमगव्हण, अभिईखेडा, डोंगरगाव, देवठाना, सोमठाना, सोमनाथ नगर या गावातील नागरिक मतदान करणार आहेत. त्यामुळे कोण निवडून येईल आणि कोण पराभूत होईल हे २०जुलैला निकालानंतर समजेल.
निवडणुकीच्या अनुषंगाने वातावरण तापले असून भेटीगाठी वाढलेल्या दिसून येत आहेत.