सन २०२० मध्ये मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसगार्चा प्रादुर्भाव वाढल्याने याचा फटका सर्वच क्षेत्राला बसला. यामधून शिक्षण क्षेत्रही सुटले नाही. कोरोनाचा आलेख खाली आल्याने २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. जिल्ह्यात पाचवी ते आठवीपर्यंत शिक्षण देणाऱ्या ८०६ शाळा असून, येथे ८१ हजार ५१८ विद्यार्थी संख्या आहे. या शाळेत ३,९०१ शिक्षक आणि १,३२८ शिक्षकेतर कर्मचारी आहेत. आतापर्यंत ३,४५३ शिक्षक आणि ९८७ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चाचणी झाली असून, यापैकी ४३ शिक्षक आणि ३ शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण ५० जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत ७९१ शाळा सुरू झाल्या असून, जवळपास ३९ हजार विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली आहे. या शाळांना विद्यार्थ्यांची हजेरी, शिक्षकांची तपासणी, एकूण बाधित असा दैनंदिन अहवाल पाठविणे बंधनकारक आहे. ७९१ शाळांचा अहवाल मिळत असून, उर्वरीत शाळा बंद असल्याने अहवाल प्राप्त होऊ शकला नाही.
१) पॉईंटर्स
जिल्ह्यात पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा -८०६
सुरू झालेल्या शाळा - ७९१
२) ग्राफ
दररोज अहवाल देणाऱ्या तालुकानिहाय शाळा
कारंजा १३८
मालेगाव १३९
मं.पीर १२८
मानोरा ९३
रिसोड १३४
वाशिम १५९
००००००
शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थी व शिक्षक उपस्थिती, कोरोना चाचणी, एकूण बाधित असा अहवाल केंद्र प्रमुखांमार्फत गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येतो. अहवाल पाठविण्यात कोणतीही अडचण जात नाही. कोरोनाचा आलेख खाली येत असल्याने शाळेतील विद्यार्थी उपस्थिती हळूहळू वाढत आहे.
- हेमंत तायडे
मुख्याध्यापक, जि.प. शाळा जांभरूण नावजी
००००००
इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाल्यानंतर शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांची हजेरी, शिक्षक उपस्थिती, शिक्षकांची चाचणी व बाधित असा अहवाल शिक्षण विभागाकडे पाठविला जातो. दैनंदिन अहवाल पाठविण्यात अडचणी नाहीत.
- उद्धव कष्टे,
मुख्याध्यापक, जि.प. शाळा काजळांबा
००००००
शाळा सुरू झाल्यानंतर संबंधित मुख्याध्यापकांनी केंद्र प्रमुखामार्फत गटशिक्षणाधिकारी आणि तेथून शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे दैनंदिन अहवाल येत आहे. ८०६ पैकी ७९१ शाळा सुरू झाल्या असून, उर्वरीत शाळेत काही शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने तर काही शाळा निवासी असल्याने बंद आहेत. त्यामुळे या १५ शाळांचा अहवाल मिळाला नाही.
- अंबादास मानकर,
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वाशिम