वाशिम : मालेगाव तालुक्यातील मौजे कुत्तरडोह येथील धरणाच्या कॅनालचे आणि सांडव्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून या कामाची चौकशी करुन त्याचा अहवाल देण्याची मागणी अरुण चिंतामण धंदरे व महादेव सिताराम धवसे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिक्षक अभियंत्यांकडे गुरुवार, ६ एप्रिल रोजी केली. धरण व कालव्याच्या बांधकामावर जास्तीत जास्त नाल्यामधील रेती माती मिक्स करुन वापरण्यात आली आहे. तसेच कालव्याचे खडीकरण देखील निकृष्ट दर्जाचे आहे. कोट्यवधी रुपयांच्या या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी; अन्यथा येत्या १७ एप्रिलपासून उपोषण करू, असा इशाराही संबंधितांनी दिला आहे.
कुत्तरडोहचे धरण, कालव्याचे काम निकृष्ट!
By admin | Published: April 06, 2017 8:38 PM