मुंगळा : वादळवारा आणि परतीच्या पावसामुळे मुंगळा परिसरातील संत्रा बागेचे अतोनात नुकसान झाले.मुंगळा येथे ३०० हेक्टरवर संत्रा बाग असून यावर्षी आंबिया बहार आल्यामुळे बºयापैकी उत्पादन होईल, अशी शेतकºयांना आशा होती. आठ दिवसांपूर्वीच्या तसेच शनिवारी सायंकाळच्या वादळवारा आणि परतीच्या पावसामुळे संत्रा बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संत्र्याची फळे मोठ्या प्रमाणात गळून पडली. यामुळे शेतकºयांची चिंता अधिकच वाढली. मुंगळा येथे कोट्यवधींची उलाढाल या संत्रा पिकावर अवलंबून असते. परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले. शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी संतोष राऊत, प्रवीण वायकर, नाथा नखाते, नामदेव घुगे, बालू बेलकर, नंदू बोबडे, विष्णु राऊत, माणिक बोबडे, बंडू राऊत आदी शेतकºयांनी केली.
मुंगळा परिसरात संत्रा बागेचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 5:48 PM