देपूळ : परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे ऊमरा शमशाेद्दीन येथील गावातील गावठाणमधील पाणी शेतात शिरून शेत खरडून गेले व विहीर बूजून गेली. विहिरीमध्ये असलेला मोटरपंपही जमिनीत दबल्याने तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पूर्व सूचना देऊनही ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्यामुळे माझे शेताचे व विहिरीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत ऊमरा शमशाेद्दीनने नुकसान भरपाई दयावी, अशी मागणी नारायण माणिकराव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. तसेच वाशिमचे तहसीलदार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पालकमंत्री यांनाही निवेदन दिले आहेत.
२००३ पासून ऊमरा गावचे सांडपाणी व पावसाचे पाणी हे सरकारी रस्त्याच्या कडेने न जाता ते नारायण ठाकरे यांच्या शेतात जाते. यासंदर्भात सदर शेतकरी दरवर्षी ग्रामपंचायतीला निवेदन देऊनही दखल घेतली जात नाही. मी दरवर्षी मजुरांमार्फत क्रेन लाऊन विहीर उपसून काढताेय. यावर्षी मात्र विहीर खचून मोटार पंपही यात गाडला गेला. यामध्ये साडेतीन लाख रुपये नुकसान झाले आहे. मला नुकसानभरपाई ग्रामपंचायतीकडून देण्यात यावी, अशी मागणी नारायण ठाकरे यांनी यांनी केली आहे
.
काेट.....
नारायण ठाकरे यांच्या शेताची व विहिरीची मोका पाहणी केली असता, असे निदर्शनास आले की, गावातील पाणी घुसून त्यांच्या शेताचे व विहिरीचे नुकसान झाले आहे. यावर ग्रामपंचायतीने उपाययोजना करायला पाहिजे. याबाबतचा अहवाल मी तहसीलदार वाशीमकडे सादर करणार
गणेश जाधव,
तलाठी उमराशमशाेद्दीन
-------------------
गावातील सांडपाणी व पावसाचे पाणी हे बांधकाम विभागाच्या रस्त्यावरील मोरी बुजल्याने पाणी रस्त्याच्या कडेने न जाता हे इतरत्र जात आहे. त्यामुळे ही दुरूस्ती करून घेण्याबाबत ग्रामपंचायत संबधितांना पत्र देणार आहे
.
व्ही. डी. पाटील,
ग्रामसेवक, उमराशमशाेद्दीन