जुन महिन्याच्या अखेरपासून जुलैच्या सुरवातीपर्यंत खंड देणाºया पावसाने आता आठवडाभरापासून ठाणच मांडले आहे. प्रत्येक तालुक्यात दरदिवशी कमी अधिक पाऊस पडत आहे. सततच्या पावसामुळे नदी, नाल्यांचा प्रवाह चांगलाच वाढला असून, जवळपास सर्वच नद्या, नाले आता दुथडीवर आहेत. जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक प्रकल्पांत आता ५० टक्के जलसाठा झाला असून, चार लघू प्रकल्प शंभर टक्के भरल्याने त्यांच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीपात्रात पाणी अडविण्यासाठी उभारलेले बंधारेही आता नदी पात्रात पाणी वाढल्याने ‘ओव्हर फ्लो’ झाले आहेत. बंधाºयाच्या भिंतीवरून पाणी सतत वाहत असल्याचे चित्र जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी पाहायला मिळत आहे. सततच्या पावसामुळे भूजल पातळीतही वाढ झाली आहे.
-------
तण व्यवस्थापनात खोळंबा
जिल्ह्यात गत आठवडाभरापासून पावसाने ठाण मांडल्याने पिकांना फायदा झाला असून, खरीप पिके चांगली बहरली आहेत. त्याचवेळी या पिकांत मोठ्या प्रमाणात तणही वाढले आहे. यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची भिती असल्याने शेतकरी तणनाशक फवारणी किंवा निंदण खुरपणाची कामे करीत आहेत. तथापि, सततच्या पावसामुळे निंदण, खुरपण अशक्य झाले आहे. तर तणनाशक फवारणीही कुचकामी ठरण्याची भिती असल्याने तण व्यवस्थापनात खोळंबा निर्माण झाला आहे.