ग्रामीण भागातील कोरोनाचा स्फोट होत असून, नागरिक भयभीत झाल्याचे दिसून येते. दापुरी खुर्द येथेही कोरोनाचे काही रुग्ण आढळून आले. प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून निर्जंतुकीकरण करण्यात आले. गावात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवु नये याकरिता ग्रा. पं. ने पुढाकार घेऊन नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन प्रत्येकाला केले आहे. गावातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी व कोरोना विषाणुचा धोका कमी होण्यासाठी ग्रामीण भागात निर्जंतुकीकरण करण्याला प्राधान्य दिले जात आहे. त्याअनुषंगाने दापुरी खुर्द येथेही निर्जंतुकीकरण करण्यात आले. ग्रामस्थांनी कोरोना विषाणूचा संसर्गचा धोका टाळण्यासाठी विनाकारण गर्दी करू नये, मास्कचा वापर करावा, हात स्वच्छ धुवावेत आदी नियमाचे पालन करण्याचे आवाहन सरपंच प्रायगबाई जाधव , ग्रा.प.सचिव भगत, तलाठी बायस्कर, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तराव जाधव, पोलीस पाटील मंजुषाबाई खरात यांनी केले आहे.
दापुरी खु. येथे निर्जंतुकीकरण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 4:43 AM