लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शालेय पोषण आहार योजनेंतर्गंत कार्यरत ‘डाटा एन्ट्री आॅपरेटर्स’च्या मानधनात जवळपास ५ हजार रुपयांची वाढ करण्यात आली असून, आता या आॅपरेटर्सना १५९०० रुपये प्रति महिना मानधन मिळणार आहे.राज्यात शालेय पोषण आहारांतर्गत धान्य पुरवठ्यासह इतर बाबींचा लेखाजोखा ठेवण्यासाठी शासनाने या योजनेंतर्गत डाटा एन्ट्री आॅपरेटर्सची नियुक्ती केली आहे. केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार योजनेंतर्गत कायगरत डाटा एंन्ट्री आॅपरेटर्स यांना प्रति महिना १० हजार ९३२ रुपये इतके मानधन देण्यात येते. योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून व्यवस्थापन, र्सिनयंत्रण व मुल्यमापन (एमएमए) या घटकाकरीता प्राप्त होणाऱ्या निधीमध्ये वाढ झाल्याने सदर डाटा एंन्ट्री आॅपरेटर्सना देण्यात येत असलेल्या मानधनात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार १ जानेवारी रोजी या संदर्भात निर्णय घेऊन शासनाने डाटा एन्ट्री आॅपरेटर्सच्या मानधनात वाढ करून ते प्रति महिना १५ हजार ९०० रुपये करण्याची घोषणा केली. या निर्णयाची अमलगबजावणी १ जानेवारी २०२० पासूनच करण्याचे निर्देश देण्यात आले असून, डाटा एन्ट्री आॅपरेटर्सच्या मानधन वाढीनुसार येणारा खर्च केंद्र शासनाकडून व्यवस्थापन, र्सिनयंत्रण व मुल्यमापन (एमएमए) या घटकाकरीता मंजूर होत असलेल्या अनुदानातून करण्याचे निर्देशही राज्य शासनाने दिले आहेत. या निर्णयामुळे शालेय पोषण आहार योजनेंतर्गत कार्यरत हजारो डाटा एन्ट्री आॅपरेटर्सना मोठा दिलासा मिळाला आहे.
पोषण आहार योजनेतील डाटा एन्ट्री ऑपरेटर्सच्या मानधनात ५ हजारांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 3:11 PM