शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

पालकाच्या वृक्ष संवर्धनातून कन्या होणार लखपती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 5:48 PM

मालेगाव: पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मालेगाव तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायतने अतिशय आदर्श आणि स्तुत्य अशी कन्या वनसमृद्धी योजना यंदाच्या वर्षापासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

- अमोल कल्याणकरमालेगाव: पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मालेगाव तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायतने अतिशय आदर्श आणि स्तुत्य अशी कन्या वनसमृद्धी योजना यंदाच्या वर्षापासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत कन्यारत्न असलेल्या पालकांनी १० वृक्षांची लागवड करून ते १९ वर्षे जगविल्यास त्यांच्या कन्येला १९ व्या वाढदिवशी एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत यंदा १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ दरम्यान जन्मलेल्या ४ कन्यांच्या पालकांची निवड होईल. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी विविध ग्रामपंचायती आपल्या क्षेत्रात वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवित आहेत. यात मालेगाव तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायतने यंदाच्या वर्षापासून कन्या वनसमृद्धी योजना राबविण्याचे ठरविले आहे. ग्रामसेवक एम. पी. वानखडे यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत  गावात वृक्षांची संख्या वाढवून पर्यावरण संवर्धन करण्यात येणार आहे. यात  १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधित कन्यारत्नाला जन्म दिलेल्या पालकांना १० वृक्ष लावून ते १९ वर्षे जगविण्यासाठी प्रोत्साहीत केले जाणार आहे. यात ५ फळझाडे आणि ५ पर्यावरण संतुलनीय झाडांचा समावेश राहणार आहे. या योजनेसाठी मुलीच्या जन्म प्रमाणपत्रासह, अल्प, अत्यल्प शेतीचा नमुना ८ अ, भुमीहीनांसाठी वृक्ष लागवडीस उपलब्ध जागेचे हमीपत्र आदि कागदपत्रे लाभार्थींकडून घेण्यात येणार आहेत. या योजनेतील लाभार्थींना ठरलेल्या रकमेचा धनादेश देण्यासाठी मालमत्ता उपकरातील ७० हजार रुपये, तसेच सरपंच वसंता लांडकर यांचे १२ हलार रुपये, उपसरपंच सदाशिव कालापाड, सदस्य बाबाराव लांडकर, सुरेंद्र गुडदे, सविता लांडकर, कडू लगड, ज्योती कव्हर, गिता शिंदे, कल्पना गुडदे यांच्याकडून प्रत्येकी २४०० रुपये मिळून एकूण १ लाख १ हजार २०० रुपये १९ वर्षांसाठी मुदतठेव म्हणून बँकेत जमा करण्यात येतील. ही रक्कम १९ वर्षांत चार लाखांच्यावर जाणार असून, याच रकमेतून वृक्ष लागवड करून ते जगविणाºया पालकांच्या कन्येला एक लाखाचा धनादेश देण्यात येईल.  एकाचवेळी दोन समस्यांवर नियंत्रणबोरगाव ग्रामपंचायतच्यावतीने राबविण्यात येणाºया कन्या वनसमृद्धी योजनेंतर्गत ४ पालकांची वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी निवड करण्यात येणार असून, त्यांच्याकडून ४० झाडे लावून ती १९ वर्षे जगविण्यात येणार आहेत. या योजनेमुळे पर्यावरणाच्या समस्येसह स्त्रीभृण हत्येच्या समस्येवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शासनाच्या वृक्ष लागवड योजनेसह बेटी बचाओ, बेटी पढाओ या अभियानालाही हातभार लागणार आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी बोरगाव ग्रामपंचायत बहुधा राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.

टॅग्स :washimवाशिमenvironmentवातावरण