लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सन २०१८-१९ पासून महाराष्ट्र शासनातर्फे सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी माहिती व तंत्रज्ञाना विभागातर्फे संकेतस्थळ कार्यरत करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर अनुसूचित जाती, विजाभज, इमाव आणि विमाप्र या प्रवर्गासाठी राबविण्यात येणाºया मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी योजना व इतर आॅनलाईन झालेल्या योजनेचे अर्ज ३१ आॅगस्टपर्यंत सादर करण्याची अंतिम मुदत आहे.मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विविध प्रकारची शिष्यवृत्ती दिली जाते. सन २०१९-२० मधील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज शासनाच्या संकेतस्थळावर भरण्यास १ आॅगस्टपासून प्रारंभ झालेला आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ आॅगस्ट २०१९ पर्यंत देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक यांनी आपल्या स्तरावरून सर्व संबंधित पात्र विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरण्याविषयी अवगत करावे, असे आवाहन समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले.
महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ आॅगस्टपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 4:28 PM