लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नऊ पिकांना विमा संरक्षण मिळणार आहे. या पिकांना दुष्काळ, पूर, भूस्खलन, चक्रीवादळ, अतिवृष्टी, कीड, रोगराई, पावसातील खंड, नैसर्गिक आग, वीज कोसळणे आदी कारणांमुळे नुकसान झाल्यास भरपाई देण्यात येणार असून त्यात सहभागी होण्याची अंतीम मुदत सोमवार, २९ जुलै आहे. जास्तीत जास्त शेतकºयांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी नजीकचे सामुहिक सुविधा केंद्र अथवा बँकेत विमा प्रस्ताव सादर करून शेतकºयांना योजनेत सहभागी होता येईल. कर्जदार शेतकºयांना पीक विमा बंधनकारक आहे; तर बिगर कर्जदार शेतकºयांना ऐच्छिक आहे. विमा प्रस्तावासोबत सातबारा उतारा, आधारकार्ड, पेरणी केलेले स्वयं घोषणापत्र जोडणे आवश्यक आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी विहित प्रपत्रात सामुहिक सुविधा केंद्र (कॉमन सर्व्हिस सेंटर) किंवा बँकेकडे विमा प्रस्ताव सादर करणे आवश्यक असून शेतकºयांनी याबाबत अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
पीक विमा योजनेत सहभागी होण्याची उद्या अंतीम मुदत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 3:33 PM