जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येते. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येत असले तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे दिसून येते. सोमवारी नव्याने ११४ रुग्ण आढळून आले तर २७२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. एका जणाचा मृत्यू झाल्याची नोंदही सोमवारी घेण्यात आली. जिल्ह्याबाहेरील ११ बाधितांची नोंद झाली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे ५७८ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने केले.
००००००००००००
२१५८ सक्रिय रुग्ण
रविवारच्या अहवालानुसार नव्याने ११४ रुग्ण आढळून आले तर २७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण २१५८ रुग्ण सक्रिय आहेत.
000000000000
१२० मृत्यूची पोर्टलवर नोंद
शहरासह जिल्ह्यातील खासगी कोविड हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्यांची नोंद पोर्टलवर होण्यास विलंब होत होता. आरोग्य विभागाने २४ मे रोजी स्पष्ट केल्यानुसार जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर गेल्या काही दिवसांत झालेल्या मृत्यूंची माहिती पोर्टलवर अपडेट करण्याची कार्यवाही सुरू होती. त्यानुसार पोर्टलवर अपडेट झालेल्या १२० मृत्यूंची नोंद सोमवारी घेण्यात आली.