जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येते. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे; तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे आशादायी चित्र आहे. मृत्यूसंख्येतही घट येत असल्याचे आशादायी चित्र आहे. शनिवारी आणखी एकाचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली. शनिवारी नव्याने ८९ रुग्ण आढळून आले, तर ३४७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्याबाहेरील ६ बाधितांची नोंद झाली आहे. मालेगाव शहरात एकही रुग्ण आढळून आला नसल्याची नोंद शनिवारच्या अहवालात घेण्यात आली. सर्वात कमी रुग्ण मालेगाव तालुक्यात आढळून आले. आतापर्यंत कोरोनामुळे ५९० जणांचा मृत्यू झाला. कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली, तरी धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने केले.
००००००००००००
११०४ सक्रिय रुग्ण
शनिवारच्या अहवालानुसार नव्याने ८९ रुग्ण आढळून आले, तर ३४७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण ११०४ रुग्ण सक्रिय आहेत.
000000000000
मालेगाव शहर निरंक
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येते. शनिवारच्या अहवालानुसार मालेगाव शहरात एकही रुग्ण आढळला नाही, तर ग्रामीण भागात चार रुग्ण आढळून आले. वाशिम शहरात सात, तर ग्रामीण भागात १६ रुग्ण आढळून आले. रिसोड शहरात तीन, तर ग्रामीण भागात १३ रुग्ण आढळून आले. याप्रमाणेच कारंजा, मंगरूळपीर व मानोरा शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक संख्येने रुग्ण आढळून आले आहेत.
०००