वाशिम : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे सत्र कायम असून, बुधवार, २६ मे रोजी आणखी ४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर ३१४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे एकूण बाधितांचा आकडा ३९,१३१वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे, मात्र मृत्यूंचे सत्र कायम असल्याने नागरिकांमध्ये धाकधूक कायम आहे. मंगळवारी आणखी चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली. दुसरीकडे नव्याने कोरोना रुग्ण आढळून येत असले, तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याचे दिसून येते. बुधवारी नव्याने ३१४ रुग्ण आढळले तर ४१० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सर्वाधिक रुग्ण मंगरूळपीर तालुक्यात ७१ तर सर्वात कमी रुग्ण रिसोड तालु्क्यात ५६ आढळले आहेत. जिल्ह्याबाहेरील ३२ बाधितांची नोंद झाली आहे.
००००००००००००
२७५४ सक्रिय रुग्ण
बुधवारच्या अहवालानुसार नव्याने ३१४ रुग्ण आढळले तर ४१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड रुग्णालय, खासगी कोविड रुग्णालय, गृह अलगीकरणात मिळून एकूण २,७५४ रुग्ण सक्रिय आहेत.
000000000000
तालुकानिहाय रुग्णसंख्या
वाशिम - ३९
मालेगाव - ५६
रिसोड - ३६
मंगरूळपीर - ७१
कारंजा - ४०
मानोरा - ४०